Recent in Technology

Advertisement

Breaking News

सहायक संचालक (माहिती) पदी विजय राऊत रूजू

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक पदी विजय राऊत रूजू झाले असून, त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.

    श्री. विजय राऊत हे पदोन्नतीने अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक म्हणून रूजू झाले आहेत. कार्यालयातील सहका-यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्र. उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार व सहका-यांनी श्री. राऊत यांचे स्वागत केले.

    श्री. विजय राऊत यांनी यापूर्वी मुंबई, अमरावती, नागपूर व वर्धा येथे माहिती सहायक म्हणुन आठ वर्षे काम केले आहे. तत्पूर्वी त्यांनी आस्थापना, लेखा व वृत्त शाखेतही काम केले आहे. यावेळी प्रदर्शन सहायक विश्वनाथ धुमाळ, वैशाली ठाकरे, कॅमेरामन नितीन खंडारकर, छायाचित्रकार मनीष झिमटे, सागर राणे, कुमार हर्दुले, मनोज थोरात, सुनील काळे, दिनेश धकाते, रूपेश सवाई, योगेश गावंडे, प्रतिक फुलाडी, गणेश वानखडे, सुधीर पुनसे, हर्षल हाडे, गजानन पवार, दीपाली ढोमणे, प्रतीक वानखडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code