- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) :दिनांक २ ऑक्टोबर २०२२ला कुकडे ले आउट, पवार सभागृह, नागपूर येथे पथदर्शक अनियतकलिक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्शल कॅप्टन अशोक खन्नाडे सर (समता सैनिक दल, राष्ट्रीय अध्यक्ष ), होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, " पथदर्शक वाट चुकलेल्या खरा पथ दाखवेल. "प्रस्तावना मार्शल संजय ओरके सर (अध्यक्ष, समता सैनिक दल, महाराष्ट्र राज्य ), यात ते म्हणाले, "मानवी मुल्यासाठी पथदर्शक वर्तमानात व भविष्यात भरीव कार्य करेल."
प्रमुख अतिथी म्हणून प्रितम बुलकुंडे (संचालक, आवाज इंडिया टी. व्ही. नागपूर )उपस्थित होते. ते म्हणाले, पथदर्शक वर्तमानात एक श्रेष्ठ वैचारिक पेरणी करणारे एक सशक्त माध्यम आहे.प्रमुख अतिथी म्हणून संदीप नगराळे उपस्थित होते. ते म्हणाले, "पथदर्शक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करेल."
कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध निवेदक, पथदर्शकचे संपादक जगदीश भगत यांनी केले.आभार प्रकाश जिंदे यांनी केले.पथदर्शक परिवारातील प्रशांत ढोले, उमेश गायकवाड, प्रकाश जिंदे, संजय मोडक, शशिकांत थुल, अलोक रामटेके ही मंडळी हजर होती.
0 टिप्पण्या