अमरावती (प्रतिनिधी) : गौतम नगर अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक पुरुषोत्तम काकडे यांच्या मातोश्री जयवंताबाई भिमरावजी काकडे यांचे अल्पशा आजाराने दि.१८/१०/२०२२ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती भीमरावजी काकडे, मुले उत्तमराव, वसंतराव, पुरुषोत्तम, मुली सौ. चंद्रकलाबाई ठोंबरे, यमुनाबाई ताजने, शीलाताई पानझाडे, जावाई, नातवंड पूनम, तन्वी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर स्थानिक हिंदू स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्य संस्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या