Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दिवाई...

  खस्तानल्या पावसानं
  असं फसोलं आम्हाले
  दाना वावरात नाई
  काय इकावं सनाले
  रगताचं पानी केलं
  काया मातीच्या हवाली
  सारी मेहनत माह्यी
  त्यानं चुलीत घातली
  बैमान गा झाले ढग
  पावसायाई बैमान
  कोनाकळे मांगा दान
  कोन राखीन इमान
  नाई दमळी खिस्यात
  आली दिवाई दिवाई
  सांगा कायनं आनता
  पोराबायाले मिठाई
  दिव्यातली वात देवा
  वाट पायते तेलाची
  माह्या आसवंपान्यानं
  वात पेटंन का त्याची
  ????????
  -आबासाहेब कडू
  ९५११८४५८३७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code