काय काय चाललय ?
खुळ जाती धर्माचच
घरोघरी वाढलय !!
नेते झाले भ्रष्टाचारी
लाचखोर अधिकारी
डोईजड झाले सारे
हीच आमची लाचारी !!
बनियाची नफेखोरी
दलालांची बेईमानी
जनता ही सैरभैर
शासनाची मनमानी !!
कुंपनच खाते शेत
रक्षक झाले भक्षक
सिंहासनी हे बैसले
नाग विषारी तक्षक !!
सत्तेचा जुगार खेळती
नेते राजरोस येथे
स्वातंत्र्याची ऐसीतैसी
होते रोज रोज येथे !!
हतबल बळीराजा
करतोय आत्महत्या
दिवसाढवळ्या होई
लोकशाहीची हो हत्या !!
नका बापू तुम्ही आता
आस धाय धाय रडू
पुन्हा आम्ही सारे आता
खरया स्वातंत्र्यास्तव लढू !!
-वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556
0 टिप्पण्या