Header Ads Widget

मोबाईलच्या वापरामुळे भरकटलेली पिढी

  आपल्या देशात covid-19 हा भयानक रोग आला. त्यामूळे clg ,classes,schools सगळे बंद आल्या. Online teaching सुरू झाले. Lockdown मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, and इतर गॅजेट्सची सवय लागली. आता ही सवय कमी करत असताना पालकांना मुलांचा मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे.आधी मुलांना काही वेळेसाठी मोबाईल हातात मिळत होता. शाळा, classes, मैदानी खेळ, यात वेळ जात होता. पण आत्ता घरी बसून मुल मोबाईल स्क्रीनच्या अत्यंत जवळ गेली आहेत.

  आजकाल आपण बघत आहोत की, मुल तासनतास मोबाईल मध्ये घुसून असतात. अभ्यास, मित्रमैत्रीणीशी बोलण, खेळणं हे सर्व फोन मध्येच होत आहे. पण पालकांना माहिती असायला हवं की, मोबाईल मुळ काय काय आजार होऊ शकतात, फोन use कारण किती धोकादायक आहे. आतच्या मुलांना तर वेगळीच सवय लागली आहे.हातात मोबाईल असल्याशिवाय जेवण पण करत नाही.आणि ही सवय लावायला पालकही तितकेच जबाबदार आहेत.जेवण करत नाही म्हणून हातात phone देऊन जेवण भरवायला सुरुवात करतात. तर इथूनच त्यांना मोबाईल ची सवय लागत जाते. जसजसं मोठे होतात, तसतस त्याची सवय वाढत जाते.यामुळे त्याचामेंदूवर परिणाम होऊ शकतो. एवढ्या कमी वयात 24 तास फोन use कारण खूप dangerous आहे. यामुळे त्याचा शरीरावर, मनावर, खूप ताण निर्माण होऊ शकतं.

  आता मुल हे social media च्या दुनियेत रमून गेले आहेत. त्यामुळं त्यांना शारीरिक खेळ यापासून मूले खूप दूर होऊ लागलेत. त्यांना त्या फोनचे जग खूप आवडतं आहे. आणि अनेक शास्त्रज्ञाच्या संशोधनातून असे दिसून आले की, phone चा जास्त वापरा मुळे मुलानमध्ये थकवा, ताण, तणाव, जास्त दिसून येत आहे. त्या मुळे त्याना मानसिक आजार होत आहेत.

● हे वाचा - देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

  सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. माझ्या फोटोला लाईक्स येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ? अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात.

  मोबाईल फोनचा अती वापर केल्याने कॅन्सरचा धोका अधिक निर्माण होऊ शकतो..यावर तुमचा विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे.फोनचा वापरामुळे कॅन्सर होऊ शकतो....अनेक शास्त्रज्ञानी अभ्यास करून हे स्पष्ट सागितले आहे. की, मोबाईल फोन मधून निघणार्या इले्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूप काळ फोनचा वापर केल्याने त्याच्या त्वचेतील उतीकाद्वारे शोषली जाते. आणि त्या उतिका तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे इले्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याचवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

  -कु. भाग्यश्री व्यंकट घूरघुरे
  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  - बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या