अमरावती (प्रतिनिधी) : आधार फाउंडेशनचा सेवापूर्ती सोहळा व दत्तक गांव योजनेचा शुभारंभ रविवार रोजी सांस्कृतिक भवन अमरावती येथे सायंकाळी 7 वाजता साजरा होणार आहे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चूभाऊ उर्फ ओमप्रकाश कडू तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा स्वीकृत सदस्य आमदार अमोल मिटकरी, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड, दत्तक गांव प्रकल्पाचे प्रमुख वसंतराव भाकरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत... आधार फाउंडेशनने खास करून आपल्यासह कुटुंबांतील सदस्यांना काही काळ का होईना चिंता मुक्त राहण्याकरिता सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा बेग यांच्या मिर्झा एक्सप्रेस या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहावे, अशी विनंती आधारच्या पारिवारिक सदस्यांनी केली आहे.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या आधार फाउंडेशनचा येत्या 2 ऑक्टोबर 2022 रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. शहरवासीयांकडून कपडे, भांडी, खेळणी, सायकलीसह जीवन उपयोगी वस्तूंचे संकलन करून मेळघाटातील गरजू बांधवांपर्यंत पोहचविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
आता आधार फाउंडेशनने शाश्वत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. मेळघाटातील भूलोरी हे गांव दत्तक घेऊन 3 वर्षात एक "आदर्श गांव" म्हणून विकसित करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. येत्या रविवारी भूलोरी गावातील विकास कामांचा शुभारंभ आणि आधारचा 7 वा सेवापूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपण सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहावे, अशी विनंती आधार फाउंडेशनचे सचिव डॉ.अनिल ढवळे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांनी केली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या