मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकर्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे दिवळीआधी त्यांच्या खात्यात जमा करून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली असून शेतकर्यांच्या व मतदार संघातील विकास कामाच्या मुद्यावर जिल्हा नियोजन समितीची मॅरेथॉन सभा गाजली.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकास कामे पूर्ण करण्याकरिता भरीव निधी मंजूर करून देण्याची मागणी केली.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात विहिरी खचलेल्या सर्व विहिरींचे पंचनामे करून सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्याकरिता MREGS अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मोर्शी वरुड तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून शेतकऱ्यांना सिंचन करतांना कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून कृषी पंपाकरिता मोर्शी वरुड तालुक्यातीमध्ये 100 kv चे अतिरिक्त ट्रांसफार्मर देण्यात यावे व गावठाणातील वाढीव विद्युत पोल उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त वर्गखोल्यांची परिस्थिती मांडली त्यामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या पडक्या भिंती, गळकी छते, वर्गात येणारे पाणी, खिडक्यांची दुरवस्था, भिंतींना पडलेल्या भेगा, तुटलेले पत्रे अशी बिकट अवस्था होत चालली आहे. मोर्शी वरुड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांची अवस्था जीर्ण होत चालली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा ऊर्जितावस्था आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले तरी मोर्शी वरुड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा धोकादायक असल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. पावसाळ्यात या धोकादायक इमारतीमुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आमचा प्रयत्न असून जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी शाळा डिजिटल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक निधी मंजूर करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी रेटून धरली.
मोर्शी वरुड तालुक्यातील ठक्कर बाप्पा, माडा मिनी माडा निधी मोर्शी वरुड तालुक्याकरिता अतिरिक्त देण्यात यावा व ग्रामीण भागातील रस्ते, स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून वरुड तालुक्यातील 1991 मधील पुनर्वसन गावातील रस्ते नाली पूल सभागृह स्मशानभूमी करिता मदत पुनर्वसन विभागा अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासह विविध समस्या मांडून मतदार संघातील विकास कामांना भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीमध्ये करण्यात आली.
0 टिप्पण्या