अमरावती (प्रतिनिधी) : आज नवरात्रौनिमित्त शनिवारी (1 ऑक्टोबर) ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजतापर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या मान्यतेने अप्पर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी आज जारी केला. ही सवलत राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू होणार नाही व ध्वनीमर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशानुसार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरासाठी सवलत देण्यात आली आहे.
अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी ध्वनी प्राधिकरण, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. वर्षातील 14 दिवसांसाठी अशा प्रकारची सवलत यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या