वाचन प्रेरणा दिन…

  वाचन प्रेरणा । दिन हा महान॥
  करू या वाचन । रात्रंदिन॥१॥
  विविध ग्रंथांचे । करील वाचन॥
  सफल जीवन । वाचकांचे॥२॥
  वाचनाच्या दिनी । करावे वाचन॥
  मनन चिंतन । नियमित॥३॥
  स्वच्छतेचा मंत्र । वाचण्यात आला॥
  स्वच्छतेत न्हाला। परिसर॥४॥
  अभ्यास तंत्राचे । सतत वाचन॥
  मनस्वी पालन । गुणवंत॥५॥
  आरोग्य संपदा । ग्रंथांचे वाचन॥
  तत्त्व आचरण । निरामय॥६॥
  वाचन प्रेरणा । दिन हा साजरा॥
  तारीख पंधरा । आँक्टोबर॥७॥
  डाँक्टर कलाम ।आज जन्मदिन॥
  करांनी वंदन । कोटी कोटी॥८॥
  -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
  रुक्मिणी नगर, अमरावती.
  भ्र. ध्व. ८०८७७४८६०९
  Email: arunbundele1@gmail.com