रेलचेल…

  आली आली दिवाळी
  सफाई झाली घराची
  स्वच्छ धुवून काढुया
  घाण काढुया मनाची
  दिवाळीच्या सणाला
  पताका लावून हार
  चांगले चांगले विचार
  एकमेकांना देवू चार
  फुले आणि फुल माळा
  सजवुया सारे सारे घर
  एकमेकांच्या मनाला
  आम्ही पडू न द्यावी चर
  जिकडे तिकडे आनंद
  असावा जीवनी मोद
  उचलून घेवुया काटे
  नष्ट करुया अवरोध
  दिप प्रज्वलन करून
  उघडुया उजेडाचे दार
  अविश्वास शंकाकुशंका
  द्वेष मत्सर करुया पार
  सहविचार सम भावाचे
  साबण उटणे अन् गंध
  चला पसरवूया बंधुंनो
  जीवनात खूप सुगंध
  तुम्हा आम्हा सर्वांची
  दिपावली सुखात जावो
  सुख समृद्धी आनंदाची
  घराघरात रेलचेल होवो
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१