• Sun. May 28th, 2023

मनपाच्या वाढीव मालमत्ता करा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    * आयुक्तांना निवेदन देत वाढीव घर टॅक्स पावतीची होळी
    * अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन
    * शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिला अल्टिमेटम
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगर पालिकेकडे उत्पन्न वाढीचे अनेक साधने उपलब्ध असतांना त्याकडे दुर्लक्ष करीत अतिरिक्त कर आकारणीच्या नावावर सामान्य माणसावर वाढीव मालमत्ता कराचा बोजा वाढविला आहे. या अन्यायकारक कर वाढीविरुद्ध व मालमत्ता करात झालेली तिप्पट कर वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक होऊन महापालिकेवर तीव्र आंदोलन केले.

    शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात राष्टवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर वाढीव घर टॅक्स पावतीची होळी करीत मनपा आयुक्त डॉ . प्रवीण आष्टीकर यांना निवेदन सादर केले. अमरावती महानगर पालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरून मालमत्ता करामध्ये ६०० रुपये स्वच्छता कराची आकारणी केली. शिवाय शिक्षण करातील अवाजवी वाढ, पाणीपट्टी कर १ टक्केची बेकायदेशीर आकारणी अशा अनेक करातून सामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड वाढविला असून ४० टक्के पर्यत मालमत्ता करात वाढ केली आहे. परंतु मुळात हि कर वाढ तिप्पट असल्याने सामान्य नागरिकांना वाढीव मालमत्ता कराचा भरणा करणे ही त्रस्त कारणारी बाब आहे. त्यामुळे ही मालमत्ता कर वाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. यावेळी मनपा आयुक्तांनी झालेल्या चर्चे दरम्यान शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी मनपा कडे उत्पन्न वाढीचे अनेक साधने असतांना प्रशासक राज काळात मनमानी पद्धतीने कर आकारणी केल्या पेक्षा राज्य शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यातून मनपाची आर्थिक स्थिती सुधारू शकणार शकते व नागरिकांवर भुर्दंड पडण्याची वेळ येणार नाही, याबाबीकडे लक्ष वेधले. तसेच बाजार परवाना विभाग सक्षम करून ऍडव्हटाईझींग, होर्डिंग्स च्या माध्यमातून सुद्धा मनपाचे उत्पन्न वाढू शकते.

    मनपाच्या मोठ्या मालमत्ता या व्यापाऱ्यांच्या घशात आहे, त्यांच्याकडूनही मोठी कर वसुलीसाठी मनपाने प्रयत्न केल्यास मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. मनपाकडे उत्पन्न वाढीचे अनेक पर्याय उपलब्ध असतांना त्याकडे दुर्लक्ष करून सामान्य नागरिकांवर वाढीव मालमत्ता कराचा बोझा पाडणे चुकीचे आहे, ही अन्यायकारक मालमत्ता कर वाढ रद्द न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याहून ही अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा अल्टिमेटम शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिली. स्थापत्य कंपनीला महापालिकेने करोडो रुपयाचे कंत्राट दिले आहे. त्यांनी ५० कोटीची मनपाची डिमांड १५० कोटींवर वाढवून देण्यासंदर्भात मनपाला आश्वस्त केले. एवढे उत्पन्न मनपाला प्राप्त होत असेल तर नियमित कर भरणाऱ्या सामान्य जनतेवर अतिरिक्त कराचा भुर्दंड का ? असा प्रश्न देखील प्रशांत डवरे यांनी उपस्थित केला. मनपाच्या मोठ्या मालमत्ता बिल्डर्सच्या घशात आहे त्याकडे लक्ष नाही, तेथूनही कर वसुली वाढायला पाहिजे. शहरातील अनेक बोगस मालमत्ता या कराच्या कक्षेत आणल्यास तेथूनही उत्पन्न मिळू शकते,याकडे मनपाचे लक्ष देऊन व मनपात उघड होणारे घोटाळे व भ्रष्टाचारावर नियंत्रण तसेच अनाठायी खर्चाकडे लक्ष दिल्यास मनपाची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असे सांगून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी आक्रमक पवितत्रा घेतला.महापालिकेने वाढीव मालमत्ता कर रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला.

    या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती-अविनाश मार्डीकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, निलेश शर्मा, माजी नगरसेवक रतन देंडूले,-प्रवीण मेश्राम, भूषण बनसोड,सपणाताई ठाकूर,ऍड. सुनील बोळे, गजानन बरडे, मनोज केवले, योगेश सवई, प्रमोद महल्ले,दिलीप शिरभाते, दिलीप कडू, राजेंद्र सांगोले, दीपक कोरपे,संजीव कथीलकर, प्रशांत महल्ले, वासुदेव वानखडे, अमोल देशमुख, चेतन वाथोडकर, सतीश चरपे, प्रशांत महल्ले,अमोल वानखडे, राजाभाऊ मोहोड, अरविंद महल्ले, रवींद्र कितुकले, बाबाराव दांगळे, प्रमोद उलहे, सागर सगणे, पी. डी. निडकर, मोहन मते, गुलाबराव राठोड, सुरेश चौधरी, जयकुमार नागे,अशोक हजारे, संजय मलणकर,गजेंद्र तिडके, डॉ. राजेंद्र दाळू, मनोज केवले, कर्नालसिंग राहल,विनोद वानखडे, शक्ती तिडके, पुरुषोत्तम राणे,रवी भैसे, सतीश रोंघे, संजय महाजन, मनीष बजाज, दिलीप अटाळकर, महेश साहू, राहुल गुप्ता, शरद शेवणे, गजानन पागृत, रोशन कडू, सतीश सावळे, महेंद्र गुलहाने, निलेश जोशी, मनीष बोदडे, बबलू वाघमारे, प्रशांत तिडके, अनिल भागावतकर, सचिन नागे, मनोहर रहाटे, किशोर भुयार, आनंद मिश्रा, किशोर देशमुख, शंकर नरवणे, प्रवीण भोरे, ऋषिकेश रेळे, शरद शेवणे, साहू जवंजाळ, कार्तिक दुर्गे, चेतन वाथोडकर, शिवपाल ठाकूर, देवेंद्र वानखडे, सुभाष वळके,प्रमोद हंबर्डे, बाबुराव बागरे, रामकृष्ण पाथरकर, गवई, दिनेश मेश्राम, संजय गायकवाड, शिवा ढेंगले,वैभव वानखडे,नरेंद्र वानखडे, प्रमोद इंगळे, सुनिल चव्हाण, प्रकाश लकडे, विजय भोयर, बाळासाहेब देशमुख, शरद जवंजाळ, शिवाजी डोंगरे,अतुल इंगळे, आनंद देशमुख, प्रतापराव देशमुख, राजेश बर्वे, सागर देशमुख, सचिन केने, योगेश देशमुख, भुषण पेंडके, विशाल तायडे, जुम्मा हसन नंदावाले, अतुल बोबडे, संतोष भगत, मुकुंद विंचूरकर, जी.आर. आजनकर,राजेंद्र टाके, सचिन दळवी, अक्षय बुरघाटे, छोटू खंडारे, सतीश देशमुख, राहुल उरकुडे, सचिन बुंदेले,संकेत अलसपुरे, सारंग देशमुख, जयेश सोनोने, रामदास इमले, विष्णुपंत कांबे, रवींद्र कितुकले, अक्षय पळसकर, अभिषेक बोळे, गणेश गुजर, उमेश टोपले, सुयोग ढोरे, अक्षय पळसकर, अंकुश आठवले, हर्षल भोंगे, अभिषेक धुरजड, सागर सगणे, प्रतीक भोकरे, सागर इंगळे, संदीप आउशिकर, सुनील बोदडे, निकेश बोबडे, मनीष पाटील, जयेश सोनोने, दिग्विजय गायगोले, अतुल इटनकर, सारंग देशमुख,संकेत बोके,अक्षय बुरघाटे, सुरज आढळके,प्रतीक भोकरे, सनाउल्ला खान ठेकेदार, हबिबखा ठेकेदार, सनाउल्ला सर, नईमभाई चुडीवाले, फारुकभाई मंडपवाले, नदिमामुल्ला,मोईन खान, दिलबर शाह, अब्दुल सत्तारभाई राराणी, फिरोज शाह,मोहम्मद शकीलभाई,असद पहेलवान, शेख शकील, अब्दुल हफिज, अब्दुल फारूक, अबरार मोहम्मद साबीर,सबदर अली,सयद असद,मोहम्मद युनूस पटेल, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी सहभागी झाले होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *