भारतीय संविधानातील धर्म स्वातंत्र्याचा अर्थ एक मिमांसा

  भारत देश हा एक विविधतेने नटलेला, विविध जाती धर्म समुदायाला घेवून चालणारा आणि धार्मिकतेला विशेष प्राधान्य़ देऊन जीवन कंठणारा देश आहे. तरी पण विश्वात तो एक मोठा लोकशाहीवादी देश म्हणून त्याची ओळख सर्वश्रूतच आहे. विशेषत: बुध्द़ भुमी म्हणून भारताची विशेष ओळख आहे. भारत हा एक संघ एक समातेने वाट चाल करणाऱ्या पैकी आहे हा देश विविध संप्रदायाने पंथाने,धर्माने खुपच समृध्द़शाली झाला आहे. आणि हा देश प्रगती प्रथावर नेण्याच काम आपण जर पाहिल तर सम्राट अशोक काळा पासून या देशाने तत्कालीन राज्य़कर्ते सुध्दा पाहिले आहे. या भारतात युगानुयुगे चालत आलेल्या परंपरा या देशाला खुपच दुरवर नेऊन ठेवतात हाही मोठा प्रश्ऩ आहे या संस्कृतीने युगानुयुगे फक्त़ विषमतेचे संवर्धन करुन एक समृद्ध अशी धार्मिक चळवळ केली आहे पुरातन काळापासून अद्ययापर्यत त्यामध्ये परिवर्तन होतांना आढळत नाही. आणि परिवर्तन झाले तरी म्हणाल असा त्या परिवर्तनाचा फारसा उपयोग झालेला नाही.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  धर्म रुढी परंपरा व्रतवैकल्य़ आणि यांच्या निगडीत बरचस काही कारण धर्मगुरूसांगतो,भक्त्ा सांगतात पण ते करत आलो नाही करित आहो तर कुठे संत्याची कांस धरली नाही. किंवा सत्य़ शोधण्याचा कधी प्रयासही केला नाही त्याची कारण ही तशीच आहे. या करिता धर्म समजून घेणे हे आले आणि त्या अनूसंघाने आजच्या ( भारतीय संविधानातील धर्म स्वतंत्राचाअर्थ) हेही समजून घेणे आणि संविधानातील धर्मस्वातंत्र बाबत या करिता या शब्दांचा प्रपंच सर्व मानव समाजाला धर्म स्वातंत्र बहाल करण्याचा मुद्दा महात्मा ज्योतिबा फुलेंनी साव्ज्निक सत्य धर्म या पुस्तकातील सातव्या नियमात सांगितला आहे वैदिक काळातील विशिष्ठ धर्माचे पालन करण्याचा आग्रह केला जात असे. मनुस्मृती देखील ब्राम्हण धर्माचा पुरस्कार करते याचे म्हत्वाचे कारण म्हणजे त्या काळात वैदिक धर्म, यज्ञ आणि कर्मकांडाना प्रोत्साहन देणारा होता. त्यामुळे ब्राह्मणांना मोठी दान दक्षिणा मिळत असे आणि त्यामुळे सर्व सामान्य लोकांचे फार शोषण होत असे आम जनतेवर हा शोषणकारी धर्म थोपविण्याचा प्रयत्न ब्राह्मणवर्गीयाकडून होत असे. या भारतात बुद्धाने मात्र जनतेला धार्मिक स्वतंत्र असले पाहिजे हे प्रकर्षाने उचलून धरले ज्या धर्मात मनुष्याचे हित श्रेठ ठरत नाही व चांगल्या कर्माने माणूस श्रेठ ठरतो या तत्वाचा बुद्धाने फार कसोशीने प्रयत्न केला. ही धर्म संकल्पना विचारात घेणे महत्वाची आहे.

  भारतातील वर्ण व्यवस्थेने ते निर्माण करणाऱ्यानी आपणास कळू दिले नाही. देव या संल्प़नेची भिती दाखवून आता पर्यंत आपण मात्र या सर्व परंपरा अगदी निमूट पणे पाळत गेलो आजही आपण पाहतोच सवर्ण विरुध्द़ शुद्राची, अती शुद्रांची, अल्प़संख्याकांची वाताहात, ससे होलपट, आणि अपमानजनक अवस्था परिवर्तन झाले तरी ती अद्यापही कायमच आहे. धर्म स्वातंत्र्याचा अर्थ याबाबतची पूर्वपिठीका ज्ञात असणे गर्जेचे आहे धर्म हा एक धर्म हा एक जिवनात चांगल्या वाईट गोष्टींचा सार, जिवन मुल्य़, जगण्याची उपयुक्तता जगण्याची सार्थकता या तमाम बाबीचा एक सयोग म्हणजे धर्म असे आपण मानतो.

  भारतीय संविधानातील धर्म स्वातंत्र्याचा अर्थ जेव्हा आपण भारतीय संविधान आपल्याला आठवले पाहिजे. आणि संविधानातील प्रस्तावना आहे. ती प्रत्येक भारतीयांनी वाचली पाहिजे नव्हे ती पाठ केली पाहिजे धर्म स्वतंत्र म्हणजे कसेही वागणे बेताल वर्तण करणे झुंडशाहीनी धर्माच्या नावार दगंली घडवीणे धार्मिकते मध्ये राजकारण आनणे हे नव्हे.

  धर्म स्वातंत्र म्हणजे प्रत्येकाला दिलेला संविधानीक हक्काच्या चौकटीत राहून समाजात राहून वावरणे, हे महत्वाचे आहे कोणत्याही धर्माला कमीजास्त़ न लेखता त्याचा आदर भाव करणे आणि विविध धर्मातून सांप्रदायातून,जातीतून, धम्मातून एकात्म़व सशक्त़ भारत बनवीने हे तेवढे महत्वाचे आहे. कुठेना, कुठे, भेद भाव हा पराकोटीला पोहचते ही परिस्थीती आजही निस्तारली नाही आजही बुरसटलेली मने वैदीक संस्कृतीने मनूवादी विचार धारेने समाज मनात सर्वहारा समाजात नव्हे कानाकोपऱ्यात, गिरीकंदरात सुध्दा ही सनातनी मनूवादी विचार धारा रुजलेली आहे या विषमता मुलक संस्कृतीचा विषारी गंध पसरलेला आहे.

  वर्णवादी संकल्पनेतून चार वर्ण निर्माण करून ब्राम्हण़, क्षत्रिय, वैश, शृद्र ज्याला वर्ण नाही असा अवर्ण म्हणून गणल्या गेला तो इथला अतिशूद्र,अस्पृश्य़, समाज होय तर अशीही वर्ण व्यवस्थेची उतरंड आहे याला धर्माचा शानदार मुलामा देऊन आपल्या धर्माचे अधिष्ठान बळकट केले आहे. माणसाला पशूतुल्य़ वागणूक देऊन आपली श्रेष्ठ़ता तेवढी कायम ठेऊन तुच्छेतेने नागविला ,वागविला तो गावकूसाबाहेरचा वंचीत पीडीत सर्वहारा उपेक्षित समाज यावर चाललेले हे दिवसा गणीक हल्ले याचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा ? का असे तर सर्व विषयाशी निगडीत शब्द़ आहे तो म्हणजे “ धर्म, तर आपण या करिता धर्म म्हणजे काय तर धर्म एक अफूची गोळी आहे.,धर्म एक मानवी मनाला त्याच्या भौतिक व आंतरिक चलन वलणाला गती देऊन एक निती नियम शिकवण चांगला माणूस घडविणे हा त्याचा अर्थ आहे.

  परंतु भारतामध्ये युगायुगापासून चालत आलेल्या रुढी परंपरा राज्य़ काभार यावर राजे महाराजे आणि धर्मगुरु याचा पगडा बसला होता. भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही अस्तिवात आली आणि सार्वभौमप्रजासताक भारत देश बनला आहे त्याचे सर्व श्रेय भारताचे सविधान निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्ऩ डॉ बाबासाहेब आंबेडकर या क्रातिसुर्याला जाते तत्कालीन प्रथम भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरालाल नेहरू, व राष्ट्रपती डॉ राजेद्र प्रसाद यांनी संविधान स्विकारून ते त्या दिवसापासून अमलात आणले आणि भारतात लोकशाही अस्तिवात आली.

  भारतीय संविधानातील कलम, परिशिष्ठ भारतातील रहिवासी असलेल्या प्रत्येकासाठी लाभदाई हितोपयोगीच आहे. पूर्वीच्या काळी ज्या पध्दतीने राज्य़कारभार चालत होता तो संविधानाने घेतला आहे आणि त्यातच ज्यावेळेस धर्म आणि त्याचे अस्तिव हा विषय जेंव्हा पुढे येतो तेव्हा इथल्या प्रत्येक धर्माला त्या त्या धर्मगुरूणी बनविलेल्या धर्म परंपरा या प्रमाणे धर्मा चरण करण्याचे स्वातंत्र भारतीय संविधानाने बहाल केले आहे. कोणत्याही धर्माचे लिखीत विधीमध्ये,ग्रंथामध्ये संविधान हस्तक्षेप करीत नाही. तर ते जो त्या धर्माचा आहे.अनुयायी आहे त्या धर्म पध्दतीने वागण्याचे अधिकार आहे. धर्म स्वातंत्र व्यक्ती स्वातंत्र तमाम स्त्री पुरूष समानतेचे अधिकार मानवाच्या हित संर्वधन करिता सर्व भारतीयांना समतामूलक व शिक्षणाच्या तमाम सोयी आदी सर्व अधिकार भारताच्या नागरिकाला संविधानाने दिले आहे.

  भारताच्या संविधानामध्ये प्रास्ताविकेत म्हटल्या प्रमाणे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम समाज वादी धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य़ घडविणाऱ्या व त्यांच्या सर्व नागरिकाला स्वातंत्र व दर्जाची व संधीची समानता बंधुता हे सर्व प्रास्ताविके मध्ये अशीही धर्म निरपेक्ष असलेली स्वातंत्र समता बधुता निर्माण करणारी व एकात्म़राष्ट्र घडविणारी संविधान प्रस्तावना या मध्ये प्रथम राष्ट्राचा अभिमान आहे. व धर्म या ठिकानी दुयम स्थानी आहे.

  आपल्या स्वत:च्या स्वार्थाकरिता किंवा एक राष्ट्र घडविणाऱ्या नादात घटनेतील कलमांना धक्का पोचत असून त्याची तिव्रता कमी करण्याचे अपण पाहतच आहोत मग ती धर्माच्या ठेकेदारांनी केलेली अखलाकची हत्या असो किंवा लव्ह़ जिहादच्या मार्गाने खोटे कुंभाड हत्या असो या ना त्या विषयावरून धर्माच्या आड लपून व गनीमी काव्या प्रमाणे एका विशिष्ट़ जातीचा तीरस्कार असो हे आता नित्याचेच झाले आहे. ज्याला त्याला धर्म स्वातंत्र आहे याचा अर्थ असा नाही की, ते व्यक्तीगत पातळीवर तुम्ही जपायचे असतेतुमची श्रध्दा उपासना पुजा अर्चा देवाची प्रस्थापना ही कुठलाही शासकीय स्तरावरील कार्यलयात होणे ही एक प्रकारची असंवैधानीक बाब आहे. याचे धर्म स्वातंत्र देत नाही.

  भारतामध्ये संविधान लागू झाल्या पासून त्याची अमंबजावणी ही होणे आणि त्याचा दरवेळेस त्याचा फालोप घेणे महत्वाचे आहे तरी पण एका धर्माच्या मोठेपणासाठी संविधानाचा बळी जाऊ नये मात्र तो जात आहे ही संविधानाची लोकशाहीची शोकांतीका आहे याचा सर्वांना विचार करणे महत्वाचे आहे मंदिर, मस्जीद वाद एक हे काही नवीन राहले नाही ज्याला त्याला त्याच्या धर्मरीवाजाने आणि त्यावर अमल करण्याचा अधिकार आहे आणि संविधानाने तो बहाल केला आहे.

  भारताचे संविधान धर्म जात पात पंथ हा कुठलाच भेद मानीत नाही सर्व समान दृष्टीकोन ठेऊन उच्च़ निचता याला मुठमाती देऊन प्रशासनीक कार्य भार चालविते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत संविधानाचे गमक आहे स्वातंत्र समता बधुता न्याय यावर अधिग्रहित झालेल सविधान धर्म स्वातंत्र तर देतेच पण त्याच बरोबर समानतेणे कस जगाव राष्ट्राची सार्वभैाम लोकशाहीत संविधान कशी महत्वाची अत्यंत मोलाची भुमीका बजावते सर्व धर्ममियांना अल्प़संख्याकांना, गिरीजन आदिवासी इतल्या बहूजनांना, मागासवर्गीयांना आणि तमाम भारतीयांना कस गुन्यागोविंद्याने राहाव याचे नीतीनियम परिशिस्ट़ एकूण समता मुलक प्रेरक भाव प्रदर्शित करून सर्व धर्मात स्वातंत्र अबाधीत ठेऊन एक प्रकारे सर्व धर्म समभावाचे एकतेचे बिज्यारोपन करते आणि धर्म स्वातंत्र अबाधित ठेवते म्हणूनच अठरा पगड जाती धर्म यादेशात असतांना भारतीय लोकशाही संविधानाने बळकट होतांना दिसते नव्हे ती झाली आहे. म्हणून जस धर्म स्वातंत्र आहे तसाच ज्याने धर्म स्वातंत्र दिले त्या संविधान कर्त्याचा हा दुरगामी विचार या समग्र भारताला एक संघ ठेवण्याचा आहे. परिणामी राष्ट्रीय एकात्मा यामुळे खुपच दृढ होतांना दिसते. संविधान हे गौरवशाली दिसते मात्र धर्म स्वातंत्र असेल तरी व्यक्तीगत पातळीवर धार्मीक पातळीवर संवैधानीक पध्दतीने ते संचालीत करणे महत्वाचे आहे.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

  धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्माचा अवास्त़व अतिरेक करून सामान्यजनांना किंवा धर्म विरोधी वर्तन करणाऱ्यांना धर्माच्या नावाखाली धर्म स्वातंत्राच्या नावाखाली एक विशिष्ठ अजेंडा राबवून इतर धर्मियाना कुठलीही हानी पोहोचणार नाही याची जाणीव संबधित संस्थेने, धर्माने, घेणे अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय संविधान व न्यायपालिका यांच्या समन्वयातून कोणावर अन्याय होणार नाही हि भूमिका संविधान बजावते. तसेच संविधान व न्याय पालिका यांच्या समन्वयातुन वयातुन ती भुमिका ऊजागर होते बहुसंख्यांक आहोत म्हणून आम्ही जे म्हणू ते इतरांनी स्विकारा यावर सुध्दा न्याय पालिका लक्ष ठेऊन असते धर्म स्वातंत्र्याची गल्ल़त होतांना बरेचदा दृष्टी पथास येते त्याचा परिपाक म्हणावे की, काय ? धर्म विषय व पुस्त़क शैक्षणिक विषय वेगवेगळे आहे शिक्षणास कुठल्याही एका धर्माची मक्तेदारी असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला तडा जणे होय.

  कलम २५-धर्मस्वातंत्र्याचा अधिकार संदर्भात संविधानाची भुमिका
  १) सदविवेक बुध्दीचे स्वातंत्र आणि धर्माचे मुक्त़ प्रतिज्ञापन आचरण व प्रसार

  भारतीय संविधानात प्रत्येक बाबीचा,विषयाचा अगदी सांगोपान अभ्यासपुर्ण चाहुबाजूंचा विचार करून मानवाच्या मनवी मनाली विविध पैलुचे तससे वैचारिक आचरण असते तसेच मानवाला कोठे तरी शिस्त लागावी किंवा तो विनयशिल शांती सौहार्दपुर्वक आचरण अशा विविध अंगानी धर्म हा आपआपल्या परिने मानवाला शिस्तीत ठेवन्याचा व एक संघ करण्याचा प्रयत्ऩ करत असते त्यामुळे मानवाच्या सृजनशिलतेला, सभ्यतेला, व त्याच्या विविधांगी या विवेक बुध्दील धर्माचे आवर्तण महत्वाचे मानले गेले आहे.

  १) सार्वजनिक जिवनात जगत असतांना जगण्याचे विविध कांगोरे असतात त्या मध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमंता यांच्या त्या भागातील अन्य़ उपबंधाच्या अधिनतेने सद्विवेक बुध्दीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्त पणे प्रतिज्ञापित करण्याच्या, आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकऱ्याला सर्व व्यक्ती सारख्यांच हक्कदार असतांत संविधानात सर्व व्यक्तींना सारखेच धार्मिक अधिकार बहाल केले आहे. मुक्तपणे धर्माचा प्रचार या मध्ये समाविष्ट़ आहेच व त्याच प्रमाणे अंगी बाळगणे किंवा आचरण शिलतेचा प्रचार प्रसाराला, अधिकाराला सर्व व्यक्ती समाज घटकांतील तमाम जन हया सारख्याच हक्दार असतात संविधान कोठे कसा भेद दर्शवित नाही.

  २) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टी मुळे

  क) धर्माचरणाशी निगडित असेल अशा कोणत्याही आर्थिक वितीय राजनैतिक या अन्यधार्मिकेतरकार्याचे विनियमन करणार्या किंवा त्यावर निबंध घालणाऱ्या ख) सामाजीक कल्याण व सुधरणा या बाबत अथवा सार्वजनिक स्वरुपाचे हिंदु धार्मिक संस्था हिंदुचे सर्व वर्ग व पोट भेद यांना खुल्या करण्याबाबत उपबंध करण्याऱ्या कोणत्याही विधेमान कायद्याच्या पवर्तनावर प्ररिणाम होणार नाही किंवा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. काही धार्मिक धर्माबदल संविधान विशिष्ट़ धोरण ठेवते.

  १) शिख धर्मा मध्ये कृपाने धारण करणे व स्वत: बरोबर बाळगणे हे शिख धर्माच्या प्रतिज्ञा पत्रात समाविष्ट़ मानले जाईल. याचे स्पष्टीकरण सुध्दा संविधानाचे नमुद आहे स्पष्टीकरणात (२) मध्ये खंड २ उपखंडात (ख) मध्ये हिंदुच्या शब्दोलेखात, शिख जैन, वा बौध्द़ धर्म प्रतिज्ञापित करण्याचा व्यक्तीचा उलेख समाविष्ट़ आहे असा त्याचा अर्थ लावल्या जाईल आणि हिंदु धार्मिक संस्थाच्या उलेखाचा अर्थही सतदनुसार लावला जाईल हे सुध्दा सविधान धर्म स्वातंत्र्याअधिकार आहे मध्ये संविधानातील स्पष्टीकरणात नमुद आहे.

  धर्मविषयक व्यवहाराचे व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य़

  धर्मविषयक :- कलम २६ :- सार्वजनिक सुव्यवस्था विनिमंत्ता आरोग्य़ यांच्या अधिनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्या पैकी कोणत्याही गटात क)धर्मदायी प्रयोजना करिता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालविण्याचा ख) धार्मिक बाबतीच आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा ग ) जंगम स्थावर संपत्ती मालकीची असल्याबाबत ती संपादन करण्याचा आणिघ) कायदानुसार आणि कायद्यानुसार अशा संपत्तीचे प्रशासन करण्याचा अधिकार असेल.

  कलम २७ :- एखाद्या विशिष्ट़ धर्माच्या संवर्धन करिता कर देणे बाबत स्वातंत्र

  कलम २८):- विवीक्षीत शैशणिक सोस्तात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थीत राहणे बाबत स्वातंत्र आणि एकूणचधर्म स्वातंत्र्याच्या संविधानकलम तत्व़ पाहता कलम २५ कलम ते ३० कलम पर्यंत त्यातील उपकलम समाविष्ट़ आहे. भारताचे सविधान हे खऱ्या अर्थाने माणसाच्या विकासाच्या उन्नती करिता तमाम पायाभूत मुलभूत गरजा त्यामध्ये हक्क़ गरजा त्यामध्ये धर्म शिक्षण संस्कृती शैक्षणिक बाबीचा कटाक्ष ठेऊन ते मानवाच्या आणि मानवी धर्माच्या संवर्धना करिता संविधानाने कुठलाही भेद भाव न ठेवता धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे.

  भारत रत्ऩ डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य़ घटणेचे शिल्पकार ,निर्माण करते म्हणून ही भुमिका बजावली ही अनमोल अशी आहे. स्वातंत्र्य़ समता बंधुता न्याय या तत्वावर संविधान आहे राष्ट्रप्रथम आहे तर राष्ट्रीयत्वाला कुठेही तडा जाऊ दिला नाही.प्रत्येक नागरिकाचे हक्क़ अबाधित ठेवले आहे.धर्म स्वातंत्र विषय संविधानाचा अर्थ या मध्ये प्रत्येक धर्म हे प्रस्थापित आहे ही अल्प़संख्याकांचे धर्म याला सुध्दा संविधानाने आपल्या कक्षेत घेतले असून त्यांना सुध्दा अधिग्रहित केले आहे. कोणताही धर्म हा राष्ट्रापेक्षा मोठा नाही आणि धर्माचे स्वातंत्र प्रत्येकात आहे धर्म विषेयक व्यहारात व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र शैक्षणिक संस्था ज्या ज्याशासनाच्या अनुदात चालतात त्यामध्ये कोणतेही शिक्षण दिले जाणार नाही.

  एकूण पाहता भारतीया संविधानाने सर्व धर्म समभाव धर्म निरपेक्षता हे तत्व़ ठेऊन धर्म संवर्धना करिता पोषक तत्वाची निर्मिती करून विविध धर्म संस्थांना एकमेव ठेवन्याचा बहुमोलाचा वाटा सविधानाने दिला आहे हा भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा अर्थ होय भारतीया संविधाने हे भारतातील नव्हे तर जगातील एकमेव सर्वोच्च़ महाग्रंथ होय.

  -शिवा प्रधान
  भोवते लेआऊट अमरावती
  मो.नं. 7057605968
  (सदर लेखाचे लेखक हे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे अभ्यासक आहेत.)
  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  – बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–