पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदार नोंदणीसाठी तहसील कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदार नोंदणीसाठी अमरावतीच्या तहसील कार्यालयात एक खिडकी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी आज दिली.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणी सुरू आहे. मतदारांच्या सुविधेसाठी तहसील कार्यालयात एक खिडकी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील सर्व झोनच्या मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्र. १८ स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयात एक खिडकी सुरू राहील. या कामासाठी अव्वल कारकून आशिष ढवळे, महसूल सहायक सुनील हिवराळे, कोतवाल प्रवीण माहुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पात्र व्यक्तींनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.