जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुंबई पोलीस कायदा 1951, कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    हा आदेश दि. 2 नोव्हेंबरच्या 24.00 वा. पर्यत अमरावती जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून ग्रामीण भागात लागू राहील. आदेश कामावरील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना लागू होणार नाही. अंत्ययात्रेव्यतिरिक्त मिरवणूकांना पोलीसांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. हा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी जारी केला.

    (छाया : संग्रहित)