• Mon. Jun 5th, 2023

‘कलाम’च्या जीवनावरील ‘शब्दशिल्पी’चे प्रकाशन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    कुही वार्ता: पाक्षिक वैदर्भीय ‘शब्दशिल्प’चे संपादक कलाम अहमद खान यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या वाड्.मयीन जीवनावरील ‘शब्दशिल्पी’ ह्या गौरवग्रंथाचे प्रकाशन व सत्कार करण्याचे योजले आहे.

    नागपूरचे कलाम अहमद खान यांनी कवी, लेखक, शायर, स्तंभलेखक म्हणून विपुल लेखन केले आहे. ते शब्दशिल्प या पाक्षिकाचे संपादकसुद्धा आहेत. त्यांचे नावे मराठी व हिंदीत कथासंग्रह, काव्यसंग्रह, हायकू असे एकूण नऊ ग्रंथ जमा आहेत. नकतेच कलाम यांनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. त्यांच्यावर व त्यांच्या लेखणीवर प्रेम करणा-या चाहत्यांनी रेखलेल्या गौरवभाष्यावरचं ‘शब्दशिल्पी’ हा गौरवग्रंथ दि.10 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 11.00 वा. राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही जि. नागपूर येथे मान्यवरांचे हस्ते प्रकाशित होत आहे; सोबतच कलाम यांचा सत्कार पण आहे. कवी, लेखक व समीक्षक मा. प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी ‘शब्दशिल्पी’ गौरवग्रंथाचे संपादन केले असून त्यात महाराष्ट्रभरातून कवी, लेखक, समीक्षक, रसिकवर्ग, मित्रमंडळी यांनी कलामच्या एकूण साहित्यिक व सांस्कृतिक कर्तृत्वावर विविधांगी अंगांनी प्रकाश टाकला आहे.

    ग्रामविकास शिक्षण संस्था, नागपूरचे सचिव मा. घनश्यामजी धवड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर चित्रपट नगरी मुंबई येथील दिग्दर्शक, संकलक व रेडिओ प्रोमोग्राफर मा. सिद्धार्थ कुलकर्णी यांचे हस्ते ‘शब्दशिल्पी’चे प्रकाशन होईल. नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संध्या पवार तसेच दै. लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक व पत्रकार मा. शफी पठाण हे भाष्य करतील. आरआयबी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गजानन मांडेकर व ‘शब्दशिल्पी’चे संपादक मा. प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या साहित्यिक कार्यक्रमाला रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन ‘शब्दशिल्प’ आणि आरआयबी महाविद्यालय परिवाराने केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *