- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी तसेच या कायद्याची परिणामकारक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समिती आज गठीत करण्यात आली असून कामकाजाविषयी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेत या समितीचे गठन करण्यात आले असून पोलीस अधिक्षक, शिक्षण अधिकारी (प्राथ,माध्य) जिल्हा व्यवसाय व तंत्रशिक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी या समितीत सदस्य असून सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव असतील. समितीवर अशासकिय सदस्यांची निवड प्रक्रिया सुरु आहे अशी माहीती समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हाभरात जनजागृतीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालय त्यात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही समिती कार्य करेल.
0 टिप्पण्या