Header Ads Widget

‘माझी वसुंधरा अभियान’ उत्कृष्ठ कामगिरीबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : ‘माझी वसुंधरा अभियाना’त अमरावती जिल्ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांना गौरविण्यात आले.

● हे वाचा - देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

    त्याचबरोबर,महालेखापाल यांच्या अधिकाधिक परिच्छेदांच्या निपटाऱ्याबद्दल उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उपायुक्त संजय पवार, लेखाधिकारी अतुल बोडखे, गजानन देशमुख, सहा. लेखाधिकारी विजय डहाळे, अव्वल कारकुन मिना नाईक, वैशाली गुहे, उपलेखापाल आशालता उईके, महसुल सहायक महेश शेरेकर व वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या