एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.
ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.
त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या