Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

गुरुकुंजात आतंर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन

    * राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 54 व्या पुण्यतीथिती निमित्य स्पर्धेचे आयोजन
    * स्पर्धकांनी आवेदन करण्याचे प्राचार्य डॉ मुरलीधर खारोडे यांचे आवाहन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या 54 व्या पुण्यतीथी महोत्सवा निमित्य गुरुकुंज आश्रम येथे राष्ट्रीय सेवा योजना व श्रीगुरूदेव आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालीयन वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन 11 आक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत करण्यात आले आहे.

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामशुध्दि विषयक विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा साहीत्य व कला विचार व भारतीय स्वातंत्र्य लढयातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे योगदान असे तिन विषय स्पर्धेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधीकारी डॉ नंदकीशोर काळे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवडलेले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला स्व इंदुताई अजाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ 5001 रुपयांचे नगद पारितोषीक,स्व शांताबाई शामरावजी बोबडे यांच्या स्मरणार्थ 4001 रुपयांचे ‍ द्वितीय पारीतोषीक,डॉ स्व अनिल गंधे यांच्या स्मरणार्थ 3001 रुपयांचे तृतीय पारीतोषीक,स्व रमेश लकडे यांच्या स्मरणार्थ 2001 रुपयांचे चतुर्थ पारीतोषीक व ॲड अशोक कोठारी यांच्या तर्फे 1001 रुपयांचे पाचवे पारीतोषीक व सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व डॉ जे.के.यांच्यातर्फे राष्ट्रसंताचे साहीत्य भेट देण्यात येणार आहे.

    ज्या स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपले आवेदनपत्र आपल्या महाविद्यालयाच्या वतीने sgayuc@gmail.com या श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यालयीन ईमेलवर पाठवावी व अधीक माहीतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधीकारी डॉ नंदकीशोर काळे यांच्या 9822411879 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुरलीधर खारोडे यांनी केले आहे .अखील भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विश्वस्त प्रमुख डॉ पी.पी.पाळेकर यांच्या मागदर्शनात वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन पुर्ण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code