Featured Post

काय घिऊन जासीन ?

Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने महागाई विरोधात ५० खोके-महागाई एकदम ओके आंदोलन

  * केंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य हीत विरोधी धोरणाचा केला जाहीर निषेध
  * पोस्टर उंचावीत व घोषणाबाजी करीत वेधले जिल्हा प्रशासनाच लक्ष
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : विद्यमान सत्ताधारी सरकारच्या वतीने जनतेच्या समस्या व अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीत वाढत्या महागाईमुळे जनसामान्यांना जीवनायपन करणे कठीण झाले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना व अंमलबजावणी सुद्धा राज्य शासनाने वतीने केली जात नाही. जनतेच्या करिता वाढती महागाई त्रासदायक ठरत असतांना सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहे. आदी बाबी लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमरावती शहर व जिल्हा च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समीप महागाईच्या विरोधात ५० खोके - एकदम ओक्के आंदोलन करण्यात आले.

  यावेळी जनतेच्या समस्या व अडचणी समजून घेऊन त्या संदर्भात मार्ग काढण्यात यावा. अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने जिल्हा प्रशासनासमक्ष करण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी-आशीष बीजवाल यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. केन्द्र व राज्य सरकारने राबविलेल्या धोरणामुळे या महागाईचे चटके सामान्य माणसाला सहन करावे लागते आहे. ही बाब स्पष्ट करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष-निखिल ठाकरे, जिल्हाध्यक्ष-प्रा. डॉ. सुशील गावंडे, शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष - आकाश हिवसे, यांचेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते द्वारे यावेळी प्रचंड घोषणाबाजी सुध्दा करण्यात आली.

  राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या महागाई विरोधात ५० खोके महागाई एकदम ओक्के हे आंदोलन करण्यात आले. याच शृंखलेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर व जिल्हा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समीप हेच आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईला केवळ केन्द्र व राज्य सरकारचे जनसामान्य हित विरोधी धोरण कारणीभूत आहे. असा आरोप करीत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध फलक उंचावीत केंद्र व राज्य सरकारच्या कार्यप्रणालीचा जाहीर निषेध नोंदवला. यासोबतच प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष-निखिल ठाकरे,शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, जिल्हाध्यक्ष-प्रा. सुशील गावंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष-आकाश हिवसे, अनिकेत मेश्राम, हेमंत बोबडे,अक्षय पळसकर, अनुप गावंडे, संकेत बोके, राहुल वाघ, श्रवण लुंगे, अभिषेक बोके, निखील पुनसे, आकाश थोरात, अभिजित कांबळे,वैभव तिडके, फिरोज शाह, मोईन खान, सागर इंगळे,अक्षय महल्ले, दिग्विजय गायगोले, प्रतीक भोकरे, प्रथमेश ठाकरे, गौतम बागडे,भूषण मोहोड आदीसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code