Recent in Technology

Advertisement

Breaking News

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्या डॉ. संगीता बर्वे यांची मुलाखत

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्या डॉ. संगीता बर्वे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 2 सप्टेंबर, शनिवार दि. 3 सप्टेंबर आणि सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    प्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमीचा ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचा आजवरचा लेखन प्रवास त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतला आहे. बाल साहित्याचा प्रवाह विस्तारण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. कविता, गीतलेखन, अनुवाद, बालसाहित्य आदी विषयांची सविस्तर माहिती, लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code