आज जेष्ठा गौरीचं पुजन. गौरीला महालक्ष्मी असंही म्हणतात. गौरी म्हणजे पार्वती. ती महादेवाची पत्नी. जेष्ठा गौरी म्हणून पुजली जाते. भाद्रपद महिण्याच्या शुद्धपक्षात अनुराधा नक्षत्रात हा सण मोठ्या उत्सवात पार पडतात. गौरी म्हणजे पार्वती असे समजून तिचं पुजन जेष्ठा नक्षत्रावर केलं जातं. त्यातच मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते. जेष्ठा नक्षत्रावर पुजन होते. म्हणून हिला जेष्ठागौरी सुद्धा म्हणतात.
जेष्ठागौरीला गणेशाची आई मानण्यात येवून गणेशाच्या आईच्या स्वरुपात तिचं पुजन केलं जातं. तिचा इतिहास असा की एकदा असूरांच्या त्रासाला कंटाळून स्रिया माता पार्वतीकडे गेल्या असता आपलं सौभाग्य अक्षय करण्याची विनंती माता पार्वतीला केली. त्यानुसार तिनं असूरांचा संहार केला. त्यानुसार सर्व स्रीयांना व त्यांच्या पतींना या गौरी रुपातील पार्वतीनं सुखी केलं. तेव्हापासून स्रिया महालक्ष्मी जेष्ठा गौरीचं पुजन करु लागल्या.
महालक्ष्मीचं पुजन हे सर्व जाती जमातीतील लोकं करतात. शेती हा प्रमुख व्यवसाय असणा-या स्रिया धान्याची राशी मांडून पुजा करतात. काही मात्र काही वनस्पतीच्या फांद्याच ठेवून पुजा करतात. या पुजेनुसार सखी पार्वतीसह त्यांच्या मुलांचीही पुजा केली जाते. पुजेमध्ये सर्व प्रकारचं जिनस ठेवलं जातं. त्यातच गौरीला आवडती असणारी आंबील विशेषतः सर्व घरी बनवली जाते. एका केळीच्या पानावर भोग म्हणून हे सर्व साहित्य सजवलं जातं.
पहिल्या दिवशी गौरीची स्थापना होते. तसेच दुस-या दिवशी जेवन व तिस-या दिवशी गौरीचं विसर्जन होतं. कोणी म्हणतात की गौरीपुजा ही अडीच दिवसाची असते. तिस-या दिवशी रितीनुसार विसर्जन होत असून या तिस-या दिवशी गौरीच्या चेह-यावर उदासीनता दिसून येते असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं पुढील वर्षीचं आमंत्रण देवून गौरीचं विसर्जन केलं जातं. यामध्ये कायम स्वरुपाच्या मुर्ती असतील तर त्या मुर्तीचं विसर्जन होत नाही. गौरीचं विसर्जन केल्यावर थोडीशी वाळू घरी आणतात. ती वाळू घरभर शिंपतात. शेतीत शिंपतात. त्याचा अर्थ असा की ही वाळू घर परीसरात टाकल्याने घरात सुखसमृद्धी नांदते. तसेच शेतमालाचे किटकापासून रक्षण होते.
या गौरीची वेगवेगळ्या प्रांतात पुजा केली जाते. दक्षिण भारतात गौरीची पिठाची प्रतिमा बनवतात. तिची मिरवणूक काढतात. कोकणात तेरड्याच्या फांदीची महालक्ष्मी म्हणून पुजा करतात. तेथे हिला मासोळ्यांचा नैवेद्य लावतात. जेष्ठा गौरी ही माता लक्ष्मीची मोठी बहिण असून तिची उत्पत्ती समुद्रमंथनातून विषाची निर्मीती झाल्यानंतर झाली. देवीचे वाहन कावळा असून ती नेहमी कमळावर विराजमान असते. पिंपळ वृक्ष हे तिचं निवासस्थान आहे. ती पाप, आळस, दुःख व कुरुपता दूर करण्याचं कार्य करते.मुख्यतः माहेरची ओढ लावणारा सण म्हणून याची ख्याती असून गणपतीच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसातच गौराईचं आगमण होत असते. म्हटलं जातं की ह्या महालक्ष्म्या तीन दिवस माहेराला येतात आणि येतांना सुखसमृद्धी भरभराट घेवून येतात. ग्रामीण भागात विशेष मजा असते. सर्व स्रीया नदीवर जातात. तिथे गाणे म्हणतात. काहीजण फुगड्याही खेळतात. या सणाला बत्तीस प्रकारच्या भाज्या करण्याची पद्धत असून काही ठिकाणी सोळा भाज्याही बनवल्या जातात.
आज महालक्ष्म्या स्थापन झालेल्या असून उद्या जेवन आहे. त्यातच दोन महिण्यानंतर का होईना, चांगल्या चांगल्या भाज्या आपल्याला खायला मिळणार आहेत. तसेच आनंदही वाटणार आहे आपल्याला. परंतू खातांना थोडं सांभाळून खावं. कारण आपण चांगलं जेवन आहे असं समजून भरपेट खाल्लं तर उद्या आपलेच पोट खराब झाल्या शिवाय राहणार नाही. तसेच भाज्याही बरोबर खा. कारण सर्वच भाज्या पोटाला सहन होत नाहीत. विष होतं. असं जर घडलं तर उद्या समस्या आपल्याचमुळं आपल्याला येतील. आनंदाच्या वातावरणाची निर्मीती दुःखदायी वातावरणात होईल. दोष आपलाच असेल आणि तो विनाकारण जेष्ठा गौरीला द्याल. जिचा काहीच दोष असणार नाही.
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या