Header Ads Widget

सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल येथील विज्ञान प्रदर्शनी मध्ये तेजल दीपक बोंद्रे चे सुयश

    पिंपळखुटा/स्वाती इंगळे

    सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल, धामणगाव रेल्वे येथे नुकतेच माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

    विद्यार्थ्यांचे कल्पकतेला वाव मिळावा व त्यांचे बुद्धिमत्तेला चालना मिळावी हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश होता. विज्ञान प्रदर्शनाचा विषय"प्रदूषण मुक्त भारत"हा होता. या विज्ञान प्रदर्शनामध्ये वर्ग ६(फ) ची विद्यार्थिनी कु. तेजल दीपक बोंद्रे हिने सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला.यावेळी तिला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चांडक यांचे हस्ते पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तेजल हिने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक श्री चांडक, उपमुख्याध्यापक श्री. हांडे, श्री राम बावस्कर, वडील प्रा. दीपक बोंद्रे, आई डॉ.संध्या बोंद्रे यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या