अमरावती (प्रतिनिधी) : दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील समस्त नागरिकांना या व्दारे जाहिर आवाहन करण्यात येते की, जिल्ह्यामध्ये सध्या पाळीव जनावरे उदा. गाय, बैल, म्हैस वर्ग या जनावरांमध्ये “लम्पी” या आजाराचा प्रादुर्भाव होत असून दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये लम्पी आजारापासून पाळीव जनावरांना प्रादुर्भाव रोखण्याकरीता खबरदारीचे अनुषंगाने वरीलप्रमाणे नमुद पाळीव जनावरांचे लागण झालेल्या गावापासुन 5 कि.मी अंतरावरील सर्व गावांमध्ये प्राधान्याने निशुल्क लसीकरण करण्यात येत आहे.
तरी “लम्पी” आजाराबाबत आपलेकडे असलेल्या जनावरांमध्ये लक्षणे आढळुन आल्यास दर्यापुर तालुक्यातील नागरिकांनी डॉ. निचळ मो. क्र. 9850588358 डॉ. देशमुख मो.क्र. 9423610775 यांचेशी तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी सहायक आयुक्त डॉ. थोटे मो. क्र. 8554897926 व डॉ. झोंबाडे मो. 9423424197 यांचेशी दुरध्वनी वरून संपर्क साधुन लक्षणे आढळुन येणा़ऱ्या जनावरांचे फोटो व आपले नाव व संपुर्ण पत्ता व्हॉटसॲपव्दारे संबंधित पशुवैदयकिय अधिकारी यांना पाठवावे. त्याचप्रमाणे माहिती कळविण्याकरिता टोल फ्री क्र. 1962 या क्रमांकाव्दारे संपर्क करावा.
तसेच “लम्पी” आजाराबाबत लक्षणे आढळुन येणाऱ्या जनावरांना इतर जनावरांपासुन विलगीकरणात ठेवावे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांनी गोठयांची फवारणी करुन परिसराचे निर्जंतुकीकरण करावे,असे आवाहन उपविभागी अधिकारी दर्यापूर यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या