Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नवीन मतदार नोंदी, स्थानांतरणाबाबत वगळणी आदींबाबत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहाकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

  पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, दि. 4 ऑगस्ट ते दि. 24 ऑक्टोबरदरम्यान दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे घरोघरी भेट देऊन तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे विभाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येईल.

  एकत्रीत प्रारुप मतदार यादी 9 नोंव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द होईल्. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधीत दि. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 असेल. विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवसांनुसार असेल. दावे व हरकती दि. 26 डिसेंबर 2022 रोजी निकाली काढण्यात येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 5 जानेवारी 2023 रोजी करण्यात येईल.

  नवतरुणांनी नोंदणी कराव्यात

  दि. 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा युवक/युवतींनी मतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करुन घ्यावी. तसेच पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनीही आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत. तसेच जे मतदार स्थानांतरीत झालेले आहेत तसेच मरण पावलेल्या मतदारांच्या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन आपल्या नावाचे स्थानांतरण किंवा वगळणीसाठी सहकार्य करावे. या कार्यक्रमांतर्गत मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे आवश्यक नमुन्यात अर्ज दाखल करुन नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादी संदर्भात इतर कामे सर्व नागरिकांना करुन घेता येतील. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनीधी (BLA) यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code