अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार, ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम ट्रॉफी, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन अवॉर्ड आदी पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज दि. 18 सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.
अर्जदारांनी कोणाचीही शिफारस न घेता आपले अर्ज थेट केंद्र शासनाला abtyas-sports.gov.in या संकेतस्थळावर सादर करावीत. अर्ज करताना अडचण आल्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या section.sp4-moyas@gov.in किंवा 011-23387432 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. पुरस्काराची माहिती व अर्जाचा विहीत नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी कळविले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या