अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन योजनेअंतर्गत ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धारणी येथे आज झाला.
यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, माजी आ. प्रभूदास भिलावेकर, साद्राबाडी गावच्या सरपंच लक्ष्मीबाई पटेल, विभागीय कृषी सह संचालक किसन मुळे, जि.प. सदस्य रामगोपाल मावस्कर, धारणी पं. स.चे माजी सभापती रोहित पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाळे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चान , औरंगाबाद जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, सतिष ताठे, राजाराम जावरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व राष्ट्रीय ग्रामीण विकास बँक यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना होत आहे शेतमालाची खरेदी किमान प्राथमिक प्रक्रिया पॅकिंग व विक्री व्यवस्था निर्माण करून योग्य भाव मिळावा यासाठी मिशन कार्यरत आहे. स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांना योग्य भाव मिळावा यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे श्री. सत्तार यांनी सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या