Recent in Technology

Advertisement

Breaking News

टोम्पे महाविद्यालयात भर पावसात ४१ रक्तदात्यांची केले रक्तदान

  * रक्तदान श्रेष्ठदान असून रक्तदानामुळे रक्तदात्याला अनेक चांगले फायदे होतात: डॉ ज्योत्स्ना भगत, आरोग्य अधिकारी
  * डॉ भगत यांच्या कोरोना दरम्यान केलेल्या कार्याचा केला सत्कार
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  चांदूर बाजार (प्रतिनिधी) : स्थानिक गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टच्या अंतर्गत गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षण महाविद्यालय, स्व. समीर देशमुख अध्यापक विद्यालय, कम्युनिटी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना व चांदूर बाजार तालुक्यातील विविध संघटना तसेच चांदूर बाजार पत्रकारसंघटना यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शिक्षक दिनाच्या पावन पर्वावर भव्य रक्तदान शिबिराचे संत नामदेव महाराज सभागृहात आयोजन करण्यात आले होते. सतत पाऊस सुरु असतांना सुद्धा शिक्षकांना अभिवादन म्हणून एकूण ४१ रक्तदात्यांची रक्तदानाचे पवित्र काम केलेत. सदर रक्तदानास पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजची रक्तपेढीची रक्तसंकलन चमू सहकार्य केले ज्यामध्ये डॉ. अंकिता भारती, डॉ श्रुती उमाळे, हंस खान, श्री. कुणाल वरघट, श्री. दिनेश चरपे, श्री. अतुल साबळे, श्री साहेबराव आलमबादे, श्री संजय दहिकर, अमित धरणे व श्री. अतुल साबळे सहकार्य लाभले.

  तदनंतर शिक्षक दिनानिमित्य छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्राचार्य डॉ. संजय शेजव, डॉ. सुभाष शिरसाट, प्रा. रवींद्र डाखोरे, डॉ. प्रियदर्शनी देशमुख, डॉ. अंकिता भारती, डॉ. श्रुती उमाळे मंचावर होते तर प्रमुख उपस्थितीत डॉ. सौ. ज्योत्स्ना भगत आरोग्य अधिकारी, चांदुर बाजार मंचावर होत्या. डॉ भगत यांनी रक्तदान श्रेष्ठदान असून रक्तदान केल्याने रक्तदात्याचे रक्त पातळ होते व त्यांना हृदय विकाराचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले. तसेच रक्तदान कोणी करावे व कोणी करून नये याबाबत माहित देत रक्तदानाबाबत गैरसमज कमी व्हावे व गरजू लोकांपर्यंत रक्त पुरवठा व्हावा या करिता जनजागृतीची आजची गरज असल्याची भावना मांडली. प्रा. डॉ. सुभाष शिरसाट यांनी भारतातील प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत असलेल्या गुरु परंपरेचे महत्व सांगत शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव टोम्पे सुद्धा गुरुस्थानी अग्रणी असल्याचे मत व्यक्त केले. श्री. भास्कराव टोम्पे यांनी रक्तदान चळवळ व्हावी याकरिता सतत आपले महाविद्यालय प्रयत्नात असून सर्वांचे सहकार्याने हे शक्य असल्याचे सांगत सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले. याप्रसंगी कोरोना दरम्यान डॉ ज्योत्सना भगत यांनी लसीकरण आणि आरोग्य सुविधेबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याबाबत महाविद्यालय तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

  रक्तदानामध्ये प्रहार सेवक श्री. ललित नागपुरे, श्री. मोहित अढाऊ व श्री अतुल घाटोळ यांनी मित्रपरिवारासह तसेच अनेक सामाजिक संघटना, हितचिंतनक, शिक्षक, विद्यार्थी यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ विजय टोम्पे, प्राचार्य डॉ संजय सेजव, प्राचार्य श्री सावरकर, डॉ मंगेश अडगोकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रफुल्ल चौधरी, सह कार्यक्रम अधिकारी, डॉ युगंधरा गुल्हाने महिला कार्यक्रम अधिकारी यांच्यासह आयोजन समिती बीएड, डीएड महाविद्यालय, सर्व विभाग, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व श्री. हर्षल ओकटे, श्रद्धा निंबोरकर तसेच अनेक विद्यार्थीयांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाचे सुबद्ध सूत्रसंचालन डॉ. गुल्हाने यांनी केले व प्रास्ताविक डॉ राजेंद्र रामटेके यांनी मांडले तर सर्व रक्तदाते, आयोजन समिती आणि रक्तसंकलन चमूचे आभार डॉ प्रशांत सातपुते यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code