अमरावती (प्रतिनिधी) : पुणे येथील ‘यशदा’तर्फे जिल्ह्यातील जिल्ह्यातील नवनियुक्त सरपंचांचे उजळणी प्रशिक्षण येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात नुकतेच झाले. त्याअंतर्गत यावली शहिद या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा अभ्यास दौरा (प्रक्षेत्र भेट) काढण्यात आला.
शाश्वत विकासाच्या संकल्पना लक्षात घेऊन लोकसहभागातून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार झाला पाहिजे जेणेकरून गावातील प्राथमिक गरजा वार्षिक विकास आराखड्यात मांडता येतील व त्यासाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच अनुषंगाने तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान विकास आराखडा, 15 वित्त आयोग व इतर शासनाच्या योजनेतून झालेली यावली (शहीद) येथील विकास कामे प्रशिक्षणार्थी सरपंचांना दाखविण्यात आली.
विकासकामांची माहिती यावली (शहीद) येथील सरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच अतुल यावलीकर यांनी सविस्तरपणे प्रशिक्षणार्थ्यांना दिली, तसेच ग्रामविकासात पदाधिकाऱ्यांचे काय महत्त्व आहे, याबद्दलही मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र भेटीदरम्यान मनरेगाच्या माध्यमातून तयार केलेले सीताफळ वन, अभ्यासिका, अंगणवाडी, सोलर प्लँट, ज्येष्ठ व्यक्तींसाठी विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक सभागृह व ग्रामपंचायत व इतर झालेली कामे दाखविण्यात आली.
सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. प्र्रशिक्षण केंद्राचे व्याख्याता संदीप वासनकर, सत्र समन्वयक मनिषा जगताप, सत्र समन्वयक प्रियंका पवार, सत्र सहाय्यक संजय चिंचोळकर, सत्र सहाय्यक अतुल साबळे यांनी आभार मानले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या