- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश चिटणीस तथा प्रदेश प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यांच्या सातुर्णास्थित निवासस्थानी सोमवारी (ता. 26) सायंकाळी सदिच्छा भेट दिली. अॅड. दिलीप एडतकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अॅड. एडतकर यांच्यावर 25 ऑगस्टला हृदय शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी नानाभाऊ पटोले यांनी विचारपूस केली. कौटुंबिक वातावरणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर यावेळी चर्चा रंगली. याप्रसंगी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष भय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश सरचिटणीस नंदकिशोर कुयटे, महाराष्ट्र उद्योग सेलचे अध्यक्ष सोनारे, प्रदेश काँग्रेसचे सचिव रामविजय बुरूंगले, माजी महापौर तथा प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, रामजी अवताडे, अमरावती शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, राजाभाऊ हाडोळे, राजीव भेले, आसिफ तवक्कल आदि यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या