अमरावती (प्रतिनिधी) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉ. सौ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेत सातत्याने विद्यार्थ्यांकरिता वैविध्यपूर्ण अभ्यास पूरक उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार व समस्त कर्मचारी वृंद राबवीतात.नुकतेच झालेल्या बैलपोळ्याच्या निमित्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयाचे प्राचार्य विवेक मोहोड, सौ. करमरकर मॅडम, अढाव सर, कलाशिक्षक विनोद इंगोले व संजय धाकुलकर यांच्या पुढाकाराने कलाशिक्षक श्री गजानन खलोरकर यांनी मातीपासून नंदीबैल बनविण्याची उत्तम कार्यशाळा विद्यार्थ्यांकरिता आयोजित केली.
स्वनिर्मितीचा आनंदच काही वेगळा असतो, आपण तयार केलेल्या बैलांचीच आपण आपल्या घरी पूजाअर्चा करू असे श्रीखलोरकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने नंदीबैलाच्या मातीच्या सुंदर प्रतिकृती यावेळी बनविल्या. आपल्या विनोदी शैलीने खलोरकर यांनी विद्यार्थ्यांना हसतमुखी व आनंदी ठेवून त्यांच्याकडून उत्कृष्टरित्या प्रात्यक्षिक करून घेतले. व सर्वांची मने जिंकली.
आयुष मडावी, चेतन नागोसे, पूर्वजा सजने, खुशी टपके, धनश्री राऊत, आरोही पानकर, ज्ञानेश्वरी जवंजाळ, केतकी रेलकर, गुंजन सारवान या विद्यार्थ्यांनी नंदीबैलाच्या मनमोहक प्रतिकृती तयार केल्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयाच्या इयत्ता सातवीतील जीत डहाडे, चाहूल गावंडे, ओम वानखडे, कृष्णा माहुरे, मयूर मदने, जितेश सोनवाने या विद्यार्थ्यांचेही कार्यशाळेला उचित सहकार्य लाभले. यावेळी शाळेच्या ज्योती मडावी, सचिन वंदे, संध्या कुरहेकर, विलास देठे, अमोल पाचपोर, दिपाली गंगारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या