अमरावती (प्रतिनिधी) : नशामुक्ती भारत अभियानांतर्गत समाज कल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील समाज कार्यमहाविद्यालय, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह यांच्या सहभागाने वक्तृत्व, निबंध लिखाण तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन यामार्फत जनजागृती करण्यात आली. शिक्षकवृंदांसह विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या