मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये मोर्शी वरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतीपिके, शेतजमीन खरडणे, घरांची परझड तसेच पशु यांची जिवित हानी इत्यादीचे नुकसानीचे प्रस्ताव मंजूर करुन तात्काळ मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
मोर्शी वरुड तालुक्यामध्ये मागील २ महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असून झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड पुरपरिस्थीती निर्माण झाली होती. यामध्ये अनेक घरात पाणी शिरल्यामुळे घरातील जिवनावश्यक वस्तू, अन्न धान्य तसेच घरातील इतर साहित्य सुध्दा वाहून गेले होते. तसेच मोठ्या प्रमाणात घरांची पुर्णतः, अंशत: पडझड सुध्दा झाली आहे. त्यामुळे अनेक कुटूंबे बेघर झालेली असुन त्यांचेपुढे जिवन जगायचे कसे हा प्रश्न पडलेला आहे. तसेच सदर अतिवृष्टीमध्ये मनुष्य, पशु हानी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बागेमध्ये प्रचंड संत्रा फळगळ झाली असून शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतजमीन खरडणे इत्यादी प्रकारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करून सानुग्रह अनुदान वाटप करणे, घरे पडल्यामुळे बेघर झालेल्या कुटूंबाची कायम निवा-याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी. याबाबत संदर्भिय पत्रान्वये ९ ऑगस्ट रोजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे कळविले होते. मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची सरसकट मदत मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोर्शी वरुड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची तसेच सद्या बेघर झालेल्या कुटूंबाची व्यवस्था करण्याबाबत स्थानीक प्रशासनाला तात्काळ निर्देश देण्यात यावे. तसेच मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट शासकीय अनुदान वाटप करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याची विनंती करण्यात आली.
मोर्शी तालुक्यामध्ये मोर्शी, हिवरखेड, शिरखेड, रिद्धपुर, अंबाडा, नेरपिंगळाई, धामणगाव महसूल मंडळातील तसेच वरुड तालुक्यातील वरुड, बेनोडा, शेंदुरजना घाट, पुसला, वाठोडा, राजुरा बाजार, लोणी महसूल मंडळातील हजारो हेक्टर क्षेत्र क्षेत्र बाधित झाले असून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मदत देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन सचिव यांना सूचना केल्या असून मोर्शी वरुड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन आमदार देवेंद्र भुयार यांना दिले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या