Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

गणरायाचे उपासनेतून आत्मशक्ती प्रगत होण्याला सर्वाना बळ लाभो- आ. सौ.सुलभाताई खोडके

    * अमरदीप गणेशोत्सव मंडळ येथे एकदंताच्या नामघोषाचा जयजयकार
    * अभय व सुरक्षा कवच देणाऱ्या सुखकर्त्या बाप्पाची श्रद्धापूर्वक उपासना
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीचा विचार समाजासमोर मांडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.जेणेकरून सर्वांना एकत्रित, संघटित, होण्यासाठी प्रेरणा मिळाली.तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे.

    गणपती बाप्पा ही सर्वांचे कल्याण करणारी, सकल जनांना आशीर्वाद देणारी देवता आहे.अमरावती शहरातही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे.श्री गजाननाच्या या उत्सवाचे व उपासनेचे एक अनन्यसाधारण महत्व आहे. स्थानिक परिसरातील नागरिकांना अपेक्षित सुविधांची उपलब्धता करून देण्यासह त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. सर्वाना आंतरिक शांती, समाधान, यश, समृद्धी,संपन्नता लाभो. हीच आपली श्री गणरायाचे चरणी प्रार्थना आहे. ताणतणाव रहित जीवनासाठी व मनुष्याची आत्मशक्ती प्रगत होण्याकरिता श्री गणेश उपासनेतून सर्वांना बळ लाभो. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी चुनाभट्टी-जनार्धन पेठ मार्ग परिसर स्थित अमरदीप गणेशोत्सव मंडळ येथील कार्यक्रमादरम्यान केले.

    गणेशोत्सव साजरा होत असतांना शहरातील विविध ठिकाणी जाऊन आमदार महोदय यांच्या वतीने भेट दिली जात आहे. याच शृंखलेत सोमवारी चुनाभट्टी-जनार्धनपेठ मार्ग समीपच्या अमरदीप गणेशोत्सव मंडळ येथे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते एकदंत श्री गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानिमित्ताने श्रीगणेशाला आवडणारी कमळे, फुले,दुर्वा, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, मोदक, कर्णमधुर संगीत, मंत्र,स्तोत्राचे नादस्पंदन,आकर्षक सजावट,यामुळे विद्येचा अधिष्ठाता गणरायाचे दरबारात एकच नवचैतन्य संचारल्याची अनुभूती सर्वानाच आली. यादरम्यान आमदार महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्थानिकांनी स्वागत केले. कार्यक्रमप्रसंगी यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, रघुनाथ पवार, जितेंद्रसिंह ठाकूर, शक्ती तिडके, ज्ञानेश्वर पाचंगे, दीपक बिलगये, महेंद्र बडघरे, हरिभाऊ पाचंगे, अक्षय बिलगये, गौरव पाचंगे, रोशन पवार, ऋत्विक पाचंगे,पार्थिक देशमुख, सौरभ पाचंगे, आदित्य उपलकर, बिट्टू वैद्य, अतुल पाचंगे, शैलेश पवार, राहुल बघेले, लोकेश वैद्य, प्रथमेश बडघरे, आकाश पाचंगे, विजय संतोषिया, विनोद वैद्य, प्रकाश पाचंगे, गिरीश गंगावणे, सुभाष जाली, जयकुमार नागे, अजय कोळपकर, प्रा. डॉ. अजय बोण्डे, बाळा नागे, सतीश रोंघे, छायाचित्रकार-महेंद्र किल्लेकर,संगीता कर्पेकर,दामीनी पवार, अरुणा पवार, ममता वैद्य,सरिता पवार, संगीता उपलकर, सुनीता पाचंगे, दीपा गंगारे, नीलिमा देशमुख, रेखा मोथरकर,संगीता पाचंगे, कोमल करपेकर , माधुरी देशमुख, अर्चना बडघरे, ममता बिलगये, अलका पाचंगे, ज्योती बिलगये, प्राची पाचंगे, गीता बडघरे, दिपाली देशमुख, सुमन पाचंगे, लता पानकर,मालती देशमुख, ज्योती पाचंगे, अश्विनी पाचंगे, शोभा देशमुख, माधुरी गंगारे, अलका पाचंगे आदींसह परिसरातील अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांचे जितेंद्रसिंह ठाकूर व शक्ती तिडके यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code