Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

महिला सक्षमीकरण रॅलीत चारशेहुन अधिक विद्यार्थींनींचा सहभाग

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आज काढण्यात आली. त्यात विविध शाळांच्या चारशेहुन अधिक विद्यार्थीनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

    विभागीय ग्रंथालयाच्या प्रांगणात माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम देशपांडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक अरविंद ढोणे, निरीक्षक दिपक गेडाम, राजाराम देवकर, धनंजय वानखेडे, रेखा राऊत आदी उपस्थित होते.

    ग्रंथालयापासुन रॅली इर्विन चौकात आल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे कॅम्प रस्त्यावरून गर्ल्स हायस्कुल चौकातुन रॅली जात जि.प. कन्या माध्यमिक शाळेत समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शुभारंभापूर्वी ग्रंथालयाच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात श्री पवार, श्रीमती भाकरे, श्रीमती पवार यांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. होलीक्रॉस मराठी विद्यालय, जिप कन्या माध्यमिक शाळा, ज्ञानमाता विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code