Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अंकुर

  माह्या लेकीचा लेकीचा
  कसा संसार फुलला
  तिच्या संसाराचा वेल
  नभी मांडवात गेला !!
  बहरला बहरला
  फुले वेलीवर फुलं
  मेघ,आभाळ मायेनं
  पोटी बीज अंकुरलं !!
  जीव फुटला मातीले
  कसा कोंबा कोंबातून
  केसर कस्तुरीचा गंध
  येई रानावनातून !!
  टंच भरलं कणीस
  झोम्बे पानोपानी शेंग
  रानी तरारल पिकं
  आले नव्हतीच रंग !!
  निघे बिजातून बीज
  कैसी निसर्गाची माया
  कधी माती होई पोट
  कधी पोट होई काया !!
  झाले घामाचे रे मोती
  असं पिकलं रे रान
  धान पेरलं मातीत
  आलं मातीतून धन !!
  -वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक (से.नि)
  अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code