- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या`आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.
रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल, गणपती येथे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मुख्य विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, सचिव मनोज जोशी , समिती अध्यक्ष जयेश ठाकूर उपस्थित होते.आपल्या संबोधनात डॉ. वडनेरे यांनी वर्तमान काळातील सायबर सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले त्यात स्मार्ट फोन, विविध ऑनलाईन पेमेंट साधने, सोशल मीडिया, नेट बँकिग सुरक्षा आदि मुद्यांचा समावेश होता.*स्मार्टफोन मित्र आणि शत्रूही :*आज प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनने महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. घरगुती वापरकत्र्यांपासून विद्यार्थी, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील सर्वच व्यक्तिं स्मार्ट फोन वापरतात. परंतु अलिकडे त्याच्या अतिविवेकी वापरामुळे अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहे.*`तंत्रस्नेही` बरोबर `तंत्रसमज` येणे आवश्यक:*सायबर सुरक्षाबाबत वर्तमानपत्र, सोशल मीडियात प्रबोधन होऊनही सायबर गुन्ह्यास बळी पडण्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण तंत्रस्नेही सर्वच बनलेत परंतु तंत्रज्ञान वापराचे जुजबी आणि विवेकी कौशल्य, जागरुकता समाजात येणे महत्वाचे आहे.
0 टिप्पण्या