Header Ads Widget

जनावरांच्या लंपी लसीसाठी पैसे आकारल्याबद्दल कर्मचारी निलंबित

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जनावरांच्या लंपी आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लस देण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी जारी केला.

    मेळघाटातील पिपादरी व रुईफाटा या गावी हा गैरप्रकार घडत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरुन प्रशासनाने ही कार्यवाही केली. कु. सविता नागोराव खनखने या पशुधन पर्यवेक्षक यांनी आठ पशुपालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे आठशे रुपये आकारल्याचे जिल्हा पशुसंवर्धन यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले. याबाबत पंचनामाही करण्यात आला आहे.

    याबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन कर्मचाऱ्याला निलंबित केले व चौकशीचे आदेश दिले आहेत.

    (Images Credit : Lokmat)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या