Header Ads Widget

अचलपूर उपविभागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : एकात्मीक फलोत्पादन अभियान सन 2022-23 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. फळे-भाजीपाला व फुलांच्या लागवडीचे तंत्र, फळबाग व बहार व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षित शेती, एकात्मीक किड व रोग अन्यद्रव्य व्यवस्थापन, पीक काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रीया केंद्रातंर्गत काजू, बेदाना प्रक्रिया, सिताफळ, आवळा, डाळींब फळांवर प्रक्रीया इ. शितसाखळी, रायपनिंग, बाजारपेठ व्यवस्थापन, माल निर्यात करण्याबाबत मार्गदर्शन, कृषि पर्यटन आदी विषयांवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

    अचलपूर उपविभागांतर्गत अचलपूर, अंजनगांव, दर्यापूर, चिखलदरा, धारणी या पाच तालुक्यातून प्रत्येकी बारा शेतकरी प्रमाणे शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी संबंधीत तालूका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन अचलपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी व्ही. एस. पथाडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या