ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खराब झाली होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण शोक व्यक्त करत आहे. नुकतंच काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका युगाचा अंत झाला, अशी भावना अनेक कलाकारांकडून व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री करीना कपूर, नीतू कपूर, शिल्पा शेट्टी, सुश्मिता सेन, गीता बसरा, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या