अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक आहे.ई- केवासी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे संबंधितांनी ती दि.7 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ई-केवायसी पूर्ण करण्यास दि. 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रीया पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्ताचा लाभ मिळणार नाही. ई-केवासी मिळण्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून, तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर- ई-केवायसी न्यू हा पर्याय निवडून ओटीपीव्दारे नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.
बँक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क साधून आधार व बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचप्रमाणे ई-केवासी करतांना कुठलीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोलरूमशी (0721-2662025) संपर्क साधावा.
सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी ई-केवासी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. 7 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या