अमरावती (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकारमार्फत देशातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवरण्यासाठी सर्व राज्यात 14567 हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे.
राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये जेष्ठांसाठी ही हेल्पलाईन चालविल्या जाणार आहे. या हेल्पलाईनचा उद्देश जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे असणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे.
हेल्पलाईन टोल फ्री क्र. 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरू असणार आहे. हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रिय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे. केली आहे. तरी हेल्पलाईनबाबत नागरिकांनी जेष्ठांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
हेल्पलाईनमार्फत आरोग्य जागृकता, निदान, उच्चार, निवारा, घरे, डे केअर सेंटर, पोषण विषय, जेष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यत्मिक, कला व करमणुक यासंबंधी माहिती दिली जाणार आहे. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, विविध प्रश्नांचे निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. क्षेत्रिय पातळीवर बेघर, अत्याचारग्रस्त, हरविलेल्या व्यक्तींची सेवा आणि काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत राहणार असल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनच्या मायावती वानखडे यांनी दिली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या