• Mon. May 29th, 2023

स्वतंत्र आंदोलनाने भारत नावाचा देश दिला – राहुल बरडे

    * भारतीय महाविद्यालयामध्ये भारताचा स्वतंत्र लढा विषयावर व्याख्यान !
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवा निमित्य भारताचा स्वतंत्र लढा विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

    ५५० पेक्षा अधिक संस्थांमध्ये विभागलेल्या या देशाला भारत म्हणून ओळख मिळवून देणे ही या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाची महत्वाची ध्येयपुर्ती आहे” असे प्रतिपादन राहुल बरडे यांनी केले. भारतीय महाविद्यालय,मोर्शी येथील इतिहास विभागाच्या वतीने स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवा निमित्य भारताचा स्वतन्त्र लढा समजून घेतांना” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

    १९२० नंतर या आंदोलनाचे नेतृत्व गांधीकडे आल्यानंतर, त्यांनी इथल सर्वसामान्य, विद्यार्थी, शेतकरी,कष्टकरी या चळवळीला जोडला एक निश्चित सामाजिक आर्थिक कार्यक्रम सुध्दा त्यांनी या चळवळीला दिला. या आंदोलनाच्या परिनामस्वरुप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांना देशाच्या सार्वजनिक जीवनात राज्यघटनेच्या माध्यमातून प्रस्थापित केले. या व्याख्यानामध्ये क्रांतीकारी चळवळी महात्मा फुले आणि बाबासाहेब यांचे सामाजिक स्वातंत्र्यातील योगदान आणि स्वांतत्र आंदोलनाला धोका देणाऱ्या उजव्या विचाधारेची कारस्थाने यावरही व्याख्याते राहुल बरडे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.

    या प्रसंगी कार्यक्रममाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ रजनीश बांबोळे हे होते . या प्रसंगी डॉ. संदीप राऊत , डॉ लाजवंती टेंभून , डॉ भगवान साबळे , डॉ सावन देशमुख , प्रा. दीपक काळे, प्रा. विनायक खांडेकर, प्रा. गोपाल भालावी , प्रा. अरविंद पाझरे, श्री रुपेश मेश्राम आणि व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थिती होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *