• Wed. Jun 7th, 2023

संत गाडगेबाबा वऱ्हाडी भाषेचे चालते बोलते विद्यापीठ- शिवा प्रधान

    * अखिल भारतीय साहित्य परिषद अमरावती विभागीय मेळावा
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा हे एक वऱ्हाडी भाषेचे चालते बोलते विद्यापीठ आहे . अमरावती ही ऐतिहासिक नगरी असून अमरावती विभाग हा एक विदर्भातील वऱ्हाडी प्रांत आहे आणि वऱ्हाडी भाषा ही आपली संस्कृती आहे ती जपली गेली पाहिजे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अमरावती विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान यांनी केले.

    अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे शाखा अमरावतीचे वतीने अमरावतीय विभागीय मेळावा नुकताच आकार भवन अमरावती येथे घेण्यात आला त्या मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले परिषदेचा हेतू हा एक समभाव दृष्टिकोनातून आहे. सर्व महान थोर विभूती यांच्या कार्यप्रतिनिष्ठ असणार आहे आणि त्या -त्या प्रांतावर प्रदेशावर त्यांच्या नावाने साहित्य संमेलन घेणे आवश्यक आहे त्यातीलच एक भाग म्हणून लवकरच अमरावती येथे पहिले संत गाडगेबाबा वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजनकरण्यात येईल असे ते म्हणाले.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर पाटील प्रमुख पाहुणे विदर्भ अध्यक्ष सहसचिव राज इंगळे प्रा.अनिता धुर्वे होते. प्रारंभी विभागीय मिळावा चे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आदर्श प्रतिमांना माल्या अर्पण करून तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ.नंदकिशोर पाटील यांनी या पहिल्या संत गाडगेबाबा साहित्य संमेलनाची निमंत्रण आणि त्या दृष्टिकोनातून संमेलन यशस्वी करण्याकरता अमरावती जिल्हा शाखेचा संपूर्ण सहभाग राहील असे सांगितले याला पाचही जिल्हाध्यक्ष आणि या बाजूला समर्थन दिले तसेच परिषदेच्या सदस्यांनी याकरिता तन-मन-धनाने सहयोग सहयोग देऊन सदस्य संख्या वाढवावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले. प्रा.अनिता धुर्वे अमरावती जिल्हा सल्लागार अनंत पानझडे यांनी सुद्धा संमेलन विषयक आपली भूमिका विशद केली.

    याप्रसंगी राज इंगळे, पद्माकर मांडवधरे,डॉ. नंदकिशोर पाटील अविनाश राजगुरे, शिवा प्रधान अनिता धुर्वे, व्ही एस न्यूज अमरावती चॅनेल चे संपादक कैलास मोरे यांचा विशेष कार्य गौरव अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच पाच जिल्ह्यातील आलेले संचालक गण यामध्ये डॉ. राजेंद्र बनसोड,नितीन सराफ, अनंत पानझडे,डॉ. गजानन हेरोळे वैभव निमकर, प्रवीण मानकर, शंकर रंदे, वैष्णवी पारधी, अमित भांडे,भिकाजी भारती महाजन, निवृत्ती राऊत, अमित भांडे राजकुमार भगत, विजय जितकर, नलिनी गवई, वर्षा इंगळे, योगिता वानखडे,हि.रा. गवई, प्रा. संजय धांडे, संजय धुर्वे सत्यप्रकाश गुप्ता तथा अमरावती नवनिर्वाचित पदाधिकारी संजय वाघुळे यांना सुद्धा गौरविण्यात आले.मेळाव्यात अमरावती शाखे द्वारे नवनिर्वाचित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये रत्ना मनोहरे अध्यक्ष तिवसा,वंदना धाकडे अध्यक्ष अचलपूर,विशाल गुल्हाने सचिव चांदुर रेल्वे प्रा. अनिता धुर्वे अध्यक्ष चांदुर रेल्वे, गाडी सर सचिव अमरावती, उपमुख्याध्यापक मंजुषा करमकर, अध्यापक भावना देशपांडे, अध्यापक सरोज देशपांडे इत्यादींची नेमणूक अमरावती शाखेत करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर मांडवधरे यांनी सूत्रसंचालन संजय धांडे तर आभार अविनाश राजगुरे यांनी मानले. मेळाव्याला पाच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणमान्य व्यक्ती,साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *