• Tue. Jun 6th, 2023

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची गरुडझेप; नॅकद्वारा A+ दर्जाने उच्च मानांकन

    * महाविद्यालयाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांची तज्ञ समितीद्वारा प्रशंसा
    * डॉ पंजाबराव देशमुख स्मृती विज्ञान केंद्र ठरले महाविद्यालयाचे वैशिष्ट्य
    * NIRF च्या अव्वल २०० तील रँकिंग नंतर पुन्हा एक उल्लेखनीय उपलब्धी
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मध्यभारतातील एक अग्रगण्य महाविद्यालय तसेच एन.आय.आर.एफ या केंद्र सरकारच्या गुणांकन यादीत भारतातील पहिल्या दोनशे दर्जेदार महाविद्यालयात स्थान प्राप्त केल्यानंतर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती ला नुकताच NAAC बंगलोर ने A+ दर्जा बहाल करून या महाविद्यालयाच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

    NAAC च्या चौथ्या नॅक मानांकनास सामोरे जाणारे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पहिलेच महाविद्यालय होय. नॅक समितीने २९ व ३० ऑगस्ट रोजी भेट देवून महाविद्यालयाचे चौथ्यांदा मुल्यांकन केले. या आधी या महाविद्यालयाने सलग तीन वेळेस नॅक द्वारा ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे.

    नॅकद्वारा नियुक्त तज्ञ समितीमध्ये डॉ. पोडीले आप्पा राव, माजी कुलगुरु, हैदराबाद विद्यापीठ, तेलंगाना हे अध्यक्ष तर डॉ. व्यंकटचलपथी आर., प्राध्यापक, भुगर्भशास्त्र विभाग, पेरीयार विद्यापीठ सालेम, तामिलनाडू हे समन्वयक तसेच डॉ. निना सेठ पजनी, प्राचार्य, गोविंदसिंह पब्लीक कॉलेज, अलोर-खन्ना लुधियाना, पंजाब यांचा समावेश होता. या त्री-सदस्यीय समितीने सलग दोन दिवस महाविद्यालयाच्या सर्व शैक्षणिक आयामांचा आढावा घेऊन मानांकनाची प्रक्रिया पुर्ण केली.

    दिनांक २९ ऑगष्ट रोजी प्रात: महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देवून मा. अतिथींचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या पॉवर पाईंट सादरीकरणानंतर अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे समन्वयक तसेच संपूर्ण चमू सोबत तज्ञ समितीने संवाद साधला. यानंतर नॅक तज्ञ समितीने महाविद्यालयाचे प्रशासन, विषय विभाग, शैक्षणिक सुविधा, भौतिक सुखसोयी, विविध अभ्यासक्रमांची रचना, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, संशोधन व प्रकाशन, संशोधन प्रयोग शाळा, तंत्रज्ञानावर आधारीत संगणक प्रणाली कृत शिक्षणाची सुव्यवस्था, क्रिडा विषयक सुविधा, पर्यावरण पुरक उपक्रम, सायन्स सेंटर, केंद्रीय संसाधन व उपकरण कक्ष, जिम्नेशियम, “ पयोष्णि ” महिला वसतिगृह, वनस्पतीशास्त्र उद्यान, जल संकलन संच, सौर उर्जा संच, वातावरणीय वायु गुणवत्ता मापन केंद्रास भेट देवून परिक्षण केले तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक या समवेत संवाद साधला.

    या भेटी दरम्यान श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी देशमुख, कोषाध्यक्ष मा. श्री. दिलीप बाबु इंगोले व संस्थेचे उच्च शिक्षण संचालक तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. डॉ. वि.गो. ठाकरे हे संस्थेचे प्रतिनिधी तसेच मा. डॉ. डी.एन. मालखेडे, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचेशी तज्ञ समितीने संवाद साधला.

    सायंकाळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक चमुने सर सि.व्ही. रमण सभागृहात श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे संस्थापक अध्यक्ष कृषी महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारीत छोट्या नाट्यछटांचे सुंदर सादरीकरण करुन तसेच शास्त्रीय गायन, नृत्य, समुहगान हे कलाविष्कार सादर करुन अतिथींना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटी नॅक तज्ञ समितीने महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक व चमुसोबत प्रदिर्घ संवाद साधला.

    समारोपीय सभेत मान्यवर तज्ञ समिती सदस्यांनी महाविद्यालयातील एकूण कार्यप्रणाली संदर्भात समाधान व्यक्त व अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. या समारोपीय सभेत तज्ञ समिती सदस्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले व महाविद्यालयास पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

    NAAC मूल्यांकनाच्या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे कार्यक्षम युवा प्राचार्य डॉ. जि.व्ही. कोरपे यांच्या सक्षम नेतृत्वात व माजी प्राचार्य डॉ. व्ही जी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात हि प्रक्रिया पार पाडली. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. डब्ल्यु.एस. बरडे यांच्या कुशल कार्यशैली तसेच माजी समन्वयक डॉ. एच.एस. लुंगे यांच्या विशेष कौशल्यातून महाविद्यालयाने सांघिक भावनेने, कार्यकर्तृत्वाने व एकोप्याने झटुन कार्य केले. सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी माजी विद्यार्थ्यांच्या उस्त्फुर्त सहभागामुळे महाविद्यालास हि भरारी घेणे शक्य झाले अशी प्रामाणिक भावना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केली.

    श्री शिवाजी शिक्षण संस्थेची सन्माननीय कार्यकारिणी व व्यवस्थापनाचे प्रमुख तथा अध्यक्ष माननीय श्री. हर्षवर्धनजी देशमुख तसेच श्री. नरेशचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष; डॉ. रामचंद्र शेळके, उपाध्यक्ष; अ‍ॅड. गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष; श्री. दिलीपबाबू इंगोले, खजिनदार; श्री हेमंत काळमेघ, सदस्य; श्री केशवराव गावंडे, सदस्य; श्री केशवराव मेतकर, सदस्य सोबतच सचिव श्री शेषराव खाडे यांच्यासह सर्व आजीवन सदस्यांनी महाविद्यालयाच्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *