शेती माती…!

    गोठ्यात शिरला लम्पी
    शेतातही पुराचा कहर
    असा का छळतो बाबा?
    का देतो वारंवार जहर?
    इतिहासाच्या पानांवर
    असला व्यक्ती नसेल
    घामाचा रक्त खर्चून
    शेतीमाती कसत असेल
    गुरेढोरे शेत शिवार
    जीव त्याचा मोलाचा
    कदर कोणी करत नाही
    पिकविलेल्या मालाचा

● हे वाचा -आयुष्यात मोठे व्हा ! पण किती?

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    पूर महापूर गारपीट
    बसतो नेहमीच तडाखा
    रक्त गोठवणाऱ्या थंडीत
    सोसत असतो कडाका
    एक नाही दुसरे तिसरे
    तयारच असतात शस्त्र
    हल्ला परतवून लावण्याचे
    त्याच्याजवळ नाही अस्त्र
    लाख लाख संकटे पाठवून
    असा चालूच ठेव थकवणे
    हार न मानता चालू ठेवेल
    माय शेती माती पिकवणे
    -पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१