- * आमदार देवेंद्र भुयार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी !
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी वरुड तालुक्यामध्ये जून-जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील अतिवृष्टी मुळे शेतीचे आणि नागरी वस्तीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून वरुड मोर्शी तालुक्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या घरांच्या व शेतातील पिकाची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार मोर्शी वरुड तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करून तसा अहवाल शासनाकडे पाठवून आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्य सचिव व मदत पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार यांच्याकडे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोर्शी वरुड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत देण्याची केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले असून कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन आमदार देवेंद्र भुयार यांना दिले.
वरुड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवालामध्ये वरुड तालुक्यातील वरुड, बेनोडा, शेंदुरजना घाट, पुसला, वाठोडा, राजुरा बाजार, लोणी महसूल मंडळातील २७२४४ हॅकटर क्षेत्र बाधित झाले असून ४२५९८ खातेदारांच्या नुकसानीची ११६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली असून मोर्शी तालुक्यामध्ये मोर्शी, हिवरखेड, शिरखेड, रिद्धपुर, अंबाडा, नेरपिंगळाई, धामणगाव महसूल मंडळातील जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र ३९९६९ हेक्टर , बागायत पिकाखालील ६८८ हेक्टर क्षेत्र, फळ पिकाखालील १०७३० हेक्टर क्षेत्र असून मोर्शी तालुक्यामध्ये एकून ५१३५८.८४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ९४ कोटी ७६ लाख ६२ हजार ८३४ रुपयांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून तात्काळ नुकसान भरपाई मदत देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली आहे. वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३६०० प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली आहे.
- ——
अतिवृष्टीमुळे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ज्यावेळी अतिवृष्टी झाली तेव्हा मला स्वाईन फ्ल्यू झाला होता मी ६ दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती होतो लगेच माझ्या लग्नाचा कालावधी असतांना सुद्धा मी उप विभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार वरुड व मोर्शी तथा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या संपर्कात राहून मोर्शी वरुड तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव तयार करून २५ ऑगस्ट ला प्रत्यक्ष मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सचिव यांना भेटून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली असून मोर्शी वरुड तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतली आहे फक्त शेतकऱ्यांनि बँक खाते तलाठ्या कडे द्यावे व माझा बाबतचे असलेले गैरसमज दूर करावे.
– आमदार देवेंद्र भुयार
● हे वाचा -देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!