• Sun. Sep 24th, 2023

मतदारांना आवाहन, निवडणूक कार्ड आधारकार्डसोबत लिंक करण्यासाठी

    * मतदान केंद्रावर रविवारी विशेष शिबिर
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती मतदार संघातील 314 मतदान केंद्रावर येत्या रविवारी, दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे उपस्थित राहून मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यास मदत करतील. तरी अमरावती विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपले आधारकार्ड आपल्या मतदान कार्डसोबत लिंक करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    मतदान कार्ड आधारकार्डसोबत निवडणूक आयोगाच्या VOTER HELP LINE APP या संकेतस्थळावर जाऊन लिंक करावे. Voter Helpline हे app या

    https://play.google.com/store/apps/detaials?id=com.eci.citizen लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करावे. त्यानंतर voter Registration ला क्लिक करुन फॉर्म 6 बी ला क्लिक करावे. Lets Start ला क्लिक करुन स्वत:चा मोबाईल नंबर टाकावा. त्यावर आलेला ओटीपी टाकल्यावर Verify ला क्लिक करावे. Voter ID असेल तर Yes I Have Voter ID हे निवडा. Voter ID नंबर टाकून राज्य महाराष्ट्र निवडा. व नंतर प्रोसिडला क्लिक करा व तुमचा आधार नंबर टाकून Done व Confirm ला क्लिक करावे. शेवटी आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा संदेश येईल.

    अमरावती विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संतोष काकडे यांनी मतदारांना शिबिराचा लाभ घेण्याबाबत कळविले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,