• Tue. Sep 19th, 2023

बेघर…!

  झोपडी झाली उध्वस्त
  ढगफुटी कशी आली..
  कमावलेली सारी कवडी
  मातीने क्षणात गिळली..
  मातीमोल झाले श्रम
  नाही किंमत ही त्याला ..
  चिंधी बांधुन पोटाला
  उरी महापुर आला..
  दैना जीवाची ही झाली
  लेकरे उपाशी झोपली..
  हाक ऐक रे देवा आता
  येतील का कामी नाती आपली..
  डोळ्यांतले अश्रू त्याचे
  अन आठवत होते श्रम..
  नव्हती पायी वहान जेव्हा
  शिरी लोटले पुन्हा रीण..
  पयपय जोडुन जेव्हा
  सुखाची झोपडी साकारली..
  क्षणाच्या त्या धारांनी
  आसवांची नदी वाहीली..
  कशाची ही शिक्षा
  सांग बा रे पांडुरंगा…
  कुठे जाणार गरीब
  अश्रू नयनी ती गंगा..
  प्रतिक्षा गजानन मांडवकर
  (स्वप्न डोळ्यातले)
  पिंपळगाव यवतमाळ
  8308684865

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,